गुजरातचा माणूस अचानक बनला करोडपती! खात्यात आले ११ कोटी आणि पुढे..

WhatsApp Group

Gujarat Man Becomes Crorepati : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका व्यक्तीसोबत एक अनोखी घटना घडली आहे, ज्यामध्ये तो काही तासांसाठी करोडपती झाला. प्रत्यक्षात २६ जुलै रोजी रमेश सागर नावाच्या व्यक्तीच्या डिमॅट खात्यात अचानक ११ कोटी रुपये आले. मात्र, काही तासांतच खात्यातील पैसे काढण्यात आले. मात्र अल्पावधीतच ‘लक्षपती’ सागरनं आपले मन लावून शेअर बाजारात २ कोटी रुपये गुंतवले, त्यातून त्याला ५ लाखांचा नफाही झाला. सागर हा कोटक सिक्युरिटीज डिमॅट खातेधारक आहे.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, रमेश सागर हा गेल्या ५-७ वर्षांपासून शेअर बाजारात नियमितपणे गुंतवणूक करत आहे. एक वर्षापूर्वी त्यानं कोटक सिक्युरिटीजमध्ये आपलं खातं उघडलं आणि अनेक समभागांमध्ये गुंतवणूक केली. सागरच्या डिमॅट खात्यात एकूण ११,६७७ कोटी रुपये आले होते. मात्र, त्यादिवशी केवळ सागरच नाही तर इतर डिमॅट खातेधारकही होते, ज्यांच्या खात्यात पैसे आले होते, त्यांचा तपशील कळू शकला नाही.

हेही वाचा – “मी तुझी साडी फाडीन..”, टोलनाक्यावर दोन महिलांमध्ये ‘फ्रीस्टाईल’ मारामारी! पाहा VIDEO

मात्र, बँकेच्या चुकीमुळं रमेश सागर यांच्या खात्यात पैसे आले होते. त्यांना बँकेकडून एक सूचना प्राप्त झाली की अॅपमध्ये मार्जिन अपडेटमध्ये समस्या आहे. नोटिफिकेशनमध्ये असं म्हटलं होतं की तुम्ही ऑर्डर देणं सुरू ठेवू शकता परंतु मार्जिन अपडेट केलं जाणार नाही. बँकेनंही याबद्दल खंत व्यक्त केली होती आणि आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं. बँकेनं पैसे काढण्यापूर्वी आठ तास पैसे रमेशच्या खात्यात होते.

बँकेत गोंधळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही देशातील विविध भागात अनेक प्रकरणं समोर आली आहेत. गेल्या वर्षी बिहारमध्ये असंच एक प्रकरण पाहायला मिळालं होतं, जेव्हा बिहारमधील एका गावात दोन मुलांच्या खात्यात चुकून पैसे जमा झाले आणि दोघेही सुमारे एक हजार कोटी रुपयांसह काही काळासाठी श्रीमंत झाले. मात्र, ही तांत्रिक अडचण होती, ती नंतर दुरुस्त करून संबंधित बँकेनं पैसे परत केले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment