रवींद्र जडेजाला आठवले बाळासाहेब ठाकरे..! शेअर केला ‘जुना’ Video; ‘हे’ आहे कारण!

WhatsApp Group

Ravindra Jadeja Shares Balasaheb Thackeray’s Video : गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. १९ जिल्ह्यांतील ८९ जागांवर मतदान करण्यासाठी मतदार रांगा लावू लागले आहेत. हे मतदान सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. या पहिल्या टप्प्यात ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र काही उमेदवार असे आहेत जे तिकीट मिळूनही चर्चेत राहिले आहेत. त्यापैकी एक क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांचेही नाव आहे. जे भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ

पण हे प्रकरण अधिकच रंजक आहे कारण रवींद्र जडेजाचे वडील काँग्रेसला मत देण्याचे आवाहन करत आहे. मतदानापूर्वी रवींद्र जडेजाने बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला असून त्यावर ‘अजूनही वेळ आहे’ असे लिहिले आहे. ”गुजरातीं लोकांनो समजून घ्या”, असे जडेजाने ट्वीटच्या कॅप्शनमध्ये म्हटले. या ट्वीटनंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

हेही वाचा – World AIDS Day 2022 : ‘या’ चुकांमुळे होऊ शकतो एड्स..! जाणून घ्या सोपे उपाय

जडेजाच्या पत्नी उत्तर जामनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. रिवाबा यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. दुसरीकडे, रवींद्र जडेजाचे वडील आणि बहीण यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला तेव्हा पत्नी रिवाबा यांनी कुटुंबात कोणतेही मतभेद नसून केवळ विचारधारेचा मुद्दा असल्याचे म्हटले होते. १८२ जागांच्या गुजरात विधानसभेत ८९ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या ७८८ उमेदवारांपैकी रिवाबा एक आहेत. २०१७ मध्ये भाजपचे धर्मेंद्रसिंह जडेजा येथून निवडणूक जिंकले होते. यावेळी त्यांचे तिकीट नाकारण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे २०१२ मध्ये काँग्रेसचे धर्मेंद्रसिंह जडेजा येथून निवडणूक जिंकले, पण पुढच्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment