Gujarat Assembly Election 2022 : गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर..! ‘या’ दिवशी लागणार निकाल

WhatsApp Group

Gujarat Assembly Election 2022 Dates : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा गुरुवारी जाहीर करण्यात आल्या. गुजरातमध्ये १ डिसेंबर आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशसह गुजरातमध्ये ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी गुजरातमध्ये एकूण ४.९ कोटी मतदार मतदानात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी ३,२४,४२२ नवीन मतदार आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही मतदाराला तक्रार करायची असल्यास. त्याचा कोणत्याही उमेदवार किंवा पक्षाचा प्रभाव असल्यास तो थेट निवडणूक आयोगाकडे मोबाईल फोनद्वारे तक्रार करू शकतो. तक्रारीच्या ६० मिनिटांत एक टीम तयार करून १०० मिनिटांत तक्रारीचे निराकरण केले जाईल.

हेही वाचा – अक्षय कुमारचं मराठी चित्रपटात पदार्पण! छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याविषयी म्हणाला…

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment