Guess Celeb : या फोटोत आजोबांच्या कुशीत दिसणारं हे मूल तुम्ही ओळखू शकता का? हा मुलगा आता मोठा होऊन एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता बनला आहे आणि त्यानं आपल्या पहिल्याच चित्रपटातून दणका उडवून दिला होता. या वर्षात बॉलीवूडला हिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्यानं आपल्या पहिल्याच चित्रपटातच सलग ५ मिनिटं डायलॉग म्हटले होते, जे हिंदी चित्रपटातील सर्वात मोठे डायलॉग मानले जातात. या मुलानं पुढं इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतले आणि पहिला चित्रपट साईन केल्यावरच त्याच्या पालकांना कळवलं.
सध्या चर्चेत असलेल्या या अभिनेत्याचं नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. हा कलाकार मूळचा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा आहे. अलीकडेच, त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात यशस्वी ठरला आणि आतापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हे मूल म्हणजे आजचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन. कार्तिकनं आपल्या आजोबांची आठवण करून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये छोटा कार्तिक खूपच क्यूट दिसत आहे. लाल रंगाच्या ड्रेसमधला कार्तिकचा निरागसपणा चाहत्यांना भुरळ घालत आहे.
हेही वाचा – रोहित आणि रश्मिका…राडाच! हिटमॅनचं चित्रपटसृष्टीत पदार्पण? पोस्टर आलं समोर!
‘प्यार का पंचनामा’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण
कार्तिक आर्यननं २०११ मध्ये ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिकनं या चित्रपटात सलग ५ मिनिटांत आपले डायलॉग म्हटले होते, जे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे डायलॉग आहेत. कार्तिकचे वडील चाइल्ड स्पेशालिस्ट डॉक्टर आणि आई स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. त्यानं मुंबईच्या डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून पदवी घेतली आहे.
‘भूल भुलैया २’ वर्षातील यशस्वी चित्रपट
कार्तिक आर्यनला सुरुवातीपासूनच चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. शिक्षणादरम्यान त्यानं मॉडेलिंग सुरू केलं. ऑडिशन्ससाठी तो तासनतास प्रवास करायचा, तब्बल तीन वर्षे ऑडिशन देऊनही यश मिळालं नाही तेव्हा त्यानं अभिनयाचा कोर्स केला. पहिला चित्रपट मिळाल्यावर मी माझ्या पालकांना याबद्दल सांगितलं.
हेही वाचा – कन्फर्म झालंच..! ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात झळकणार शाहरुख खान; पाहा प्रोमो!
कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जमा होत असताना, ‘भूल भुलैया २’ चांगलाच गाजला. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिकने रूह बाबा म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकली. आता रूह बाबाचे हे पात्र कॉमिक बुकमध्ये देखील दिसणार आहे, ज्याची माहिती अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कार्तिकचा ‘भूल भुलैया २’ हा यावर्षी १५० कोटींहून अधिक कमाई करणारा यशस्वी चित्रपट ठरला आहे.