GST Council Meet 2023 : थेटरमधील खाद्यपदार्थ स्वस्त, 18 टक्क्यांऐवजी ‘इतका’ जीएसटी लागणार!

WhatsApp Group

GST Council Meet 2023 : तुम्हाला सिनेमा हॉल किंवा मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता चित्रपट पाहताना तुम्हाला पॉपकॉर्न खाण्याचा किंवा कोल्ड ड्रिंक्स पिण्याचा विचार करावा लागणार नाही कारण जीएसटी काऊन्सिलने आता मल्टिप्लेक्समध्ये विकल्या जाणार्‍या खाद्यपदार्थ आणि शीतपेयांवरचा कर कमी केला आहे. सिनेमागृहातील खाण्यापिण्यावर 18 टक्के जीएसटीऐवजी 5 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.

मल्टिप्लेक्स चालकांनीही जीएसटी परिषदेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कोरोना महामारीनंतर प्रतिकूल परिस्थितीतून जात असलेल्या थिएटर मालकांना मदत तर मिळेलच, असे संचालकांचे म्हणणे आहे. 2020 मध्ये कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद झाल्याचे ऑपरेटर्सने सांगितले. त्यांना मार्च 2022 मध्ये पूर्ण क्षमतेने उघडण्याची परवानगी देण्यात आली.

हेही वाचा – GST Council Meet 2023 : मोठा धक्का! ‘या’ गाड्या महागणार; एर्टिगा, इनोव्हा आणि…

पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडचे ​​सीएफओ नितीन सूद म्हणाले की, संपूर्ण सिने उद्योग GST परिषदेच्या निर्णयाचे स्वागत करतो. सरकारच्या या निर्णयानंतर सिनेमागृह उद्योगाचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. ते म्हणाले की देशभरात अशी 9000 हून अधिक सिनेमागृहे आहेत, जी जीएसटीशी संबंधित खटले टाळू शकतील आणि त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असतील.

गेमिंग कंपन्यांवरील वाढीव कर

मंगळवारी झालेल्या GST काऊन्सिलच्या बैठकीत ऑनलाइन गेमिंग कंपन्या, कॅसिनो आणि घोड्यांच्या शर्यतींवरील बेटिंगच्या एकूण रकमेवर 28 टक्के दराने कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या डिनुट्युक्सिमॅब आणि दुर्मिळ आजारांवर वापरल्या जाणार्‍या औषधांना जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment