पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी..! ज्येष्ठ नागरिकांना मोदी सरकारची भेट, 80 वर्षे किंवा…

WhatsApp Group

Additional Compassionate Pension : ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार आता 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना अतिरिक्त पेन्शनचा लाभ देणार आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अलीकडील अधिसूचनेनुसार, केंद्र सरकार या पेन्शनधारकांना अनुकंपा भत्त्याच्या नावाने अतिरिक्त पेन्शन देईल.

निवृत्तिवेतन मंत्रालयाने 80 वर्षे वय गाठलेल्या सेवानिवृत्त केंद्र सरकारच्या नागरी सेवा कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. या अतिरिक्त भत्त्यांच्या वितरणाची प्रक्रिया सुलभ करणे हा मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश आहे. CCS (पेन्शन) नियम 2021 च्या नियम 44 मधील उपनियम 6 मधील तरतुदीनुसार, सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याचे वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक पूर्ण झाल्यानंतर नियमांनुसार पेन्शन आणि अनुकंपा भत्ता दिला जाईल.

हेही वाचा – PM Mudra Loan : आता 10 नव्हे तर ‘इतक्या’ लाखांचे कर्ज देणार सरकार!

कोणत्या वयोगटातील लोकांसाठी किती अतिरिक्त पेन्शन?

80 ते 85 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक मूळ पेन्शनच्या 20 टक्के, तर 85 ते 90 वर्षे वयोगटातील निवृत्तीवेतनधारकांना मूळ पेन्शनच्या 30 टक्के रक्कम मिळेल. 90 ते 95 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक मूलभूत पेन्शनच्या 40 टक्के आणि 95 ते 100 वर्षे वयोगटातील लोकांना 50 टक्के पेन्शन मिळतील. 100 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सुपर सीनियर्स 100 टक्के मूळ पेन्शनसाठी पात्र असतील.

उदाहरणावरून समजून घ्या

20 ऑगस्ट 1942 रोजी जन्मलेले पेन्शनधारक 1 ऑगस्ट 2022 पासून मूळ पेन्शनच्या 20 टक्के दराने अतिरिक्त पेन्शनसाठी पात्र असतील. 1 ऑगस्ट 1942 रोजी जन्मलेले पेन्शनधारक देखील 1 ऑगस्ट 2022 पासून मूळ पेन्शनच्या वीस टक्के दराने अतिरिक्त पेन्शनसाठी पात्र असतील.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment