सिम कार्ड विकणाऱ्यांना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक, सरकारचं कडक पाऊल!

WhatsApp Group

Mobile SIM Card : मोबाईल फोनच्या सिमकार्डद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सिमकार्ड विकणाऱ्या डीलर्सना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात सिमकार्ड कनेक्शन देण्याच्या तरतुदीवरही बंदी घालण्यात आली आहे. रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सरकारने 52 लाख मोबाईल कनेक्शन बंद केले आहेत. तर 67,000 सिम कार्ड डीलर्सना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. मे 2023 पासून, सिम कार्ड डीलर्सविरुद्ध 300 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की WhatsApp ने त्यांच्या वतीने 66,000 खाती ब्लॉक केली आहेत जी फसवणूक करत आहेत. सिमकार्ड विक्रेत्यांसाठी पोलिस पडताळणी अनिवार्य करण्यात आली असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच, ‘या’ शहरात पेट्रोल, डिझेल स्वस्त

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सिम कार्ड डीलर्सचे व्हेरिफिकेशन टेलिकॉम कंपन्यांकडून केले जाईल. डीलरची नियुक्ती करण्यापूर्वी ते प्रत्येक अर्जदाराचे तपशील आणि त्याच्या व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे पडताळणीसाठी गोळा करतील. त्यांनी सांगितले की देशात 10 लाख सिमकार्ड डीलर आहेत आणि त्यांना त्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, बल्क कनेक्शनची सेवा बंद करण्यात आली आहे. त्याच्या जागी आता व्यवसाय कनेक्शनची नवीन तरतूद लागू करण्यात आली आहे. सिम डीलर्सच्या केवायसीसोबतच सिम घेणाऱ्या व्यक्तीची केवायसीही केली जाईल.

देशातील सायबर घोटाळेबाज फसवणूक केल्यानंतर लगेच सिमकार्ड बदलतात. काही काळापूर्वी ओडिशात 16000 प्री-अॅक्टिव्हेटेड सिम कार्ड जप्त करण्यात आले होते. हे सिमकार्ड अशा लोकांच्या नावाने घेतले होते ज्यांना त्याची माहिती नव्हती.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment