सायबर क्राइम ही एक गंभीर समस्या आहे. हे थांबवण्यासाठी सरकार सातत्याने नवनवीन पावले उचलत आहे. आता भारत सरकारने गुगलला प्ले स्टोअर (Google Play Store) वरून फ्रॉड लोन अॅप्स (Google Removed 2500 Fraud Loan Apps) काढून टाकण्याचे आवाहन केले होते. या आवाहनावर कारवाई करत, गुगलने प्ले स्टोअरवरून 2,500 हून अधिक फ्रॉड लोन अॅप्स काढून टाकले आहेत. एप्रिल 2021 ते जुलै 2022 दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. फ्रॉड लोन अॅप्स सहसा कमी व्याज दर आणि सुलभ कर्जाचे आश्वासन देतात. मात्र या अॅप्सच्या माध्यमातून लोकांकडून अवैधरित्या पैसे गोळा केले जातात.
सरकार अशा अॅप्सवर कारवाई करण्याचा सातत्याने विचार करत असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले होते. गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून 2,500 फ्रॉड लोन अॅप्स काढून टाकले आहेत. हे अॅप कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होते. FSDC च्या बैठकीतही या कारवाईवर चर्चा झाली. FSDC ही सायबर सुरक्षेवर काम करणारी संस्था आहे. या प्रकरणी या संस्थेने सरकार आणि गुगल यांच्यात सहकार्याची मागणी केली होती.
निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या, ”आरबीआयने सरकारकडे अॅप्सची यादी जारी केली होती. सरकारने ही यादी गुगलसोबत शेअर केली होती. या 2,500 फ्रॉड लोन अॅप स्टोअर्सच्या मदतीने वितरित केले जात असल्याचे आढळून आले. याच कारणामुळे गुगलने हे अॅप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला.”
हेही वाचा – चुकून बँक अकाऊंटमध्ये लाखो रुपये आले आणि ते काढले तर काय होईल?
गुगलने कर्ज देणाऱ्या अॅप्सचे धोरण अपडेट केले आहे. प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या सर्व कर्ज देणार्या अॅप्सना या नवीन धोरणाचे पालन करावे लागेल. सरकारने गुगलला सांगितले होते की, प्ले स्टोअरवर कर्ज देणारी अनेक अॅप्स फ्रॉड आहेत. या अॅप्सद्वारे कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात होती. गुगलने या तक्रारीची चौकशी केली आणि सुमारे 3500 कर्ज देणारी अॅप्स फ्रॉड आढळले. यातील सुमारे 2500 अॅप तातडीने काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!