गूगलकडून गेम..! शादी डॉट कॉम सह 10 ॲप प्ले स्टोअरवरून हटवले

WhatsApp Group

App Removed From Google Play Store | गूगलने भारतीय ॲप्सवर मोठी कारवाई केली आहे. गूगलने हे 10 ॲप्स आपल्या अँड्रॉइड प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. या यादीत अनेक अनेक मोठी नावे आहेत. यामध्ये Shaadi.com, Naukri.com, 99 एकर या नावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी कंपनीने काही ॲप डेव्हलपर्सनाही इशारा दिला होता.

काही ॲप्स गूगलच्या बिलिंग धोरणांमध्ये अयशस्वी झाल्याचे दिसून आले. यानंतर त्यांना इशारा देण्यात आला. आता अखेर 10 ॲप्सवर कारवाई करत गूगलने हे ॲप्स गूगल प्ले स्टोअर वरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गूगलने अद्याप सर्व वादग्रस्त ॲप्सची यादी जाहीर केलेली नाही.

गूगलने काही ॲप्सवर कारवाई केली आहे ज्यांची नावे समोर आली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही नावे आहेत Kuku FM, Bharat Matrimony, Shaadi.com, Naukri.com, 99 acres, Truly Madly, Quack Quack, Stage, Alt Balaji.

हेही वाचा – “मला मोकळं करा…”, गौतम गंभीरचा राजकारण सोडण्याचा निर्णय, भाजप अध्यक्षांना विनंती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण सेवा शुल्क न भरण्याबाबत आहे. या कारणास्तव, गूगलने हे ॲप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक स्टार्टअप्सना असे वाटत होते की गूगलने शुल्क आकारू नये आणि नंतर त्यांनी हे पेमेंट केले नाही. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले. यामध्ये गूगलला हिरवा सिग्नल मिळाला असून ॲप्सला कोणताही दिलासा दिला नाही. यानंतर त्यांना शुल्क भरण्यास सांगण्यात आले, अन्यथा त्यांचे ॲप काढून टाकले जातील.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment