अमेरिकेत बंद होणार Google Pay..! कंपनीचा निर्णय

WhatsApp Group

Google Pay App | गुगल पे ॲप हे ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे ॲप आज लोकांची पहिली पसंती आहे. हे भारत, सिंगापूर आणि अमेरिका इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पण आता कंपनीने या ॲपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गुगल आता जुने गुगल ॲप बंद करणार आहे. अँड्रॉइड होमस्क्रीनवर दिसणारे ‘GPay’ ॲप हे जुने व्हर्जन आहे, जे पेमेंट आणि फायनान्ससाठी वापरे जाते. मात्र, भारतातील लोकांना याची काळजी करण्याची गरज नाही कारण कंपनीने हा निर्णय अमेरिकेसाठी घेतला आहे.

अहवालानुसार, GPay 4 जून 2024 पासून अमेरिकेत काम करणे बंद करेल. भारत आणि सिंगापूरमध्ये GPay वापरणाऱ्या लोकांना काळजी करण्याची गरज नाही, कारण ते दोन्ही ठिकाणी सामान्यपणे काम करत राहील. कंपनीने एका ब्लॉगद्वारे ही माहिती दिली आहे की Google Pay ॲपचा अनुभव सुलभ करण्यासाठी, 4 जूनपासून स्टँडअलोन Google Pay ॲपचे अमेरिकन व्हर्जन वापरता येणार नाही. अमेरिकेत ही सेवा बंद केली जाईल, मात्र भारत आणि सिंगापूरमध्ये ही सेवा सुरू राहतील.

हेही वाचा – Voter ID Card : मतदान ओळखपत्र हरवलंय? ‘असं’ मिळवू शकता नवं कार्ड!

Peer-to-Peer पेमेंट बंद

ॲप बंद होणार असेल तर गुगलने पीअर-टू-पीअर पेमेंटही बंद केले आहे. ब्लॉगमध्ये असे सांगण्यात आले आहे की, अमेरिकेत गुगल पे ॲप बंद झाल्यानंतर अमेरिकन यूजर्स यापुढे ॲपद्वारे इतर लोकांना पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकणार नाहीत. अमेरिकेतील Google Pay वापरकर्त्यांना कंपनीने Google Wallet ॲपवर जाण्याचा सल्ला दिला आहे. गुगलचे म्हणणे आहे की ते आपल्या वापरकर्त्यांना वेळोवेळी अपडेट्स देत राहील.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment