Google Layoffs : गुगलने संपूर्ण टीमला नोकरीवरून काढलं!

WhatsApp Group

Google Layoffs : गुगलचे कर्मचारी अनेक दिवसांपासून सतत अडचणीत आहेत. त्यांच्यावर कपातीची टांगती तलवार कायम आहे. एकापाठोपाठ एक, खर्च कपातीसारखे विविध कारण सांगून अनेक विभागातून लोकांना काढून टाकले जात आहे. आता विविध मीडिया रिपोर्ट्सने दावा केला आहे की सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वाखालील अल्फाबेटने संपूर्ण पायथन टीमला काढून टाकले आहे.

फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, गुगलने आपल्या पायथन टीमचे वेतन जास्त असल्याने त्यांना काढून टाकले आहे. त्याऐवजी ते आता अमेरिकेबाहेरील स्वस्त कर्मचाऱ्यांसह हा संघ तयार करणार आहे. जर्मनीतील म्युनिक येथे नवा संघ तयार होईल, असे मानले जात आहे. तेथे त्यांना कमी वेतनावर कर्मचारी मिळतील.

गुगल पायथन टीमच्या माजी सदस्याने लिहिले, की त्यांनी दोन दशके गुगलमध्ये काम केले. हे त्यांचे सर्वोत्तम काम होते. आता टाळेबंदीमुळे ते खूपच निराश झाले आहेत. दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने लिहिले की, आमच्या मॅनेजरसह आमच्या संपूर्ण टीमला कामावरून काढून टाकण्यात आल्याचे त्यांना खूप वाईट वाटते. आता आमच्या जागी परदेशात बसलेली टीम काम करेल. हा भांडवलशाहीचा नकारात्मक परिणाम आहे. ही छोटी टीम पायथनशी संबंधित गुगलचे बहुतेक काम पाहत असे. असे असतानाही स्वस्त मजुरांमुळे त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2024 : आयपीएलदरम्यान टीम इंडिया अमेरिकेला रवाना होणार, तारीख आली समोर!

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, गुगलने रिअल इस्टेट आणि फायनान्स विभागातही टाळेबंदी केली आहे. गुगलच्या फायनान्स चीफ रुथ पोराट यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे माहिती दिली की कंपनी पुनर्रचना करत आहे. आम्हाला बंगळुरू, मेक्सिको सिटी आणि डब्लिनमधील वाढीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. यापूर्वी, गुगलने अभियांत्रिकी, हार्डवेअर आणि असिस्टंट टीममधील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावरील गुंतवणूक वाढवण्यासाठी कंपनीने ही टाळेबंदी केली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment