शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर..! पैशांअभावी थांबणार नाही कुठलंही काम; वाचा सविस्तर

WhatsApp Group

Good News For Farmers : तुम्ही स्वतः शेतकरी असाल किंवा तुमच्या घरी शेती करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. ही बातमी वाचून तुम्हाला आनंद होईल. होय, पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी १३व्या हप्त्यापूर्वीच एक आनंदाची बातमी आहे. नव्या गुड न्यूज अंतर्गत आता कोणत्याही शेतकऱ्याचे कोणतेही काम पैशांअभावी थांबणार नाही. वास्तविक, कृषी तंत्रज्ञान कंपनी ओरिगो कमोडिटीज आणि फिनटेक कंपनी विवृत्ती कॅपिटल यांच्यात करार झाला आहे.

१०० कोटींचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट

दोन्ही कंपन्यांमधील करारानुसार शेतकरी, कृषी व्यापारी आणि शेतकरी उत्पादक संघटना (FPO) यांना कोणत्याही हमीशिवाय दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे. ओरिगो कमोडिटीजच्या वतीने सांगण्यात आले की, कंपनीने डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे मार्च २०२३ पर्यंत १०० कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गुरुग्रामस्थित ओरिगो कमोडिटीज ही अॅग्री-फिनटेक कंपनी आहे. त्याची सुरुवात २०११ साली झाली.

हेही वाचा – मोदी सरकार महिलांना देतंय २.२० लाख रुपये? तुमच्याही खात्यात येणार पैसे?

ओरिगो कमोडिटी सप्लाय चेन कापणीनंतरचे व्यवस्थापन, व्यापार आणि वित्तपुरवठा करते. कंपनीच्या जीएस (कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी) सान्या अग्रवाल यांनी सांगितले की, शेतकरी, व्यापारी, शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) यांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज देण्यासाठी त्यांनी विवृत्ती कॅपिटलशी हातमिळवणी केली आहे. याशिवाय कंपनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कृषी उत्पादनांसाठी ग्राहक शोधण्यात मदत करेल.

त्यांनी सांगितले की ओरिगो कमोडिटीज देखील कृषी उत्पादनाची गुणवत्ता तपासेल. शेतकऱ्यांना १६ ते १७ टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज दिले जाईल. आम्ही ओरिगो eMandi कॅश प्लॅटफॉर्मचा वापर कृषी उत्पादक आणि बँकांमधील एक माध्यम म्हणून करेल.

Leave a comment