Bonus and DA Hike News In Marathi : केंद्रीय सरकारने (Modi Govt) केंद्रीय कर्मचार्यांसाठी नॉन-प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (Adhoc Bonus) मंजूर केला आहे. दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून (7th Pay Commission) ही मोठी भेट आहे. वित्त मंत्रालयाने मंगळवारी 2022-23 साठी केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी हा बोनस 7,000 रुपयांपर्यंत आहे. याशिवाय सरकारने महागाई भत्त्याबाबतही आनंदाची बातमी दिली आहे.
केंद्र सरकारच्या अंतर्गत गट ब आणि क गटात येणाऱ्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांनाही हा बोनस मिळणार आहे. याशिवाय केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांनाही बोनसचा लाभ दिला जातो. या बोनसमध्ये तुम्हाला 30 दिवसांच्या पगाराइतके पैसे मिळतील.
हेही वाचा – Gold Silver Price Today In Marathi : आज सोने महाग, चांदीही वाढली!
महागाई भत्त्यामध्ये वाढ (DA Hike In Marathi)
सरकारकडून आज बुधवारी आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (DA Hike) वाढ करण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यांना आत्तापर्यंत मिळणारा डीए 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!