महाराष्ट्राचा वडापाव जगभर फेमस केला तो तामिळनाडूच्या या माणसाने!

WhatsApp Group

तामिळनाडूतील एका सामान्य कुटुंबात व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer Success Story) यांचा जन्म झाला. 2004 मध्ये त्यांनी वडा पावचे दुकान सुरू केले. महाराष्ट्रातील हा सर्वांचा आवडता नाश्ता आहे, परंतु हळूहळू त्याची ख्याती संपूर्ण भारतात पसरली. वडापावची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन व्यंकटेश यांनी हा मोठा व्यवसाय बनवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या वडापाव कंपनीचे नाव आहे ‘गोली वडा पाव’ (Goli Vada Pav).

आज गोली वडा पावचे 350 आऊटलेट्स आहेत. यावरून त्यांच्या व्यवसायाच्या यशाचा अंदाज लावता येतो. हार्वर्ड ते आयएसबी हैदराबादपर्यंत त्यांच्या व्यवसायावर केस स्टडी करण्यात आली आहे. गोली वडा पाव सुमारे 20 राज्यांमध्ये पसरला आहे. पाश्चिमात्य शैलीवर आधारित गोली वडा पावचे आऊटलेट्स लहान दिसू शकतात, परंतु त्या दुकानांची एकूण उलाढाल वार्षिक 55 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

गोली नावापाठचे कारण!

गोली या शब्दामागे एक रंजक कथा आहे. व्यंकटेश यांनी त्यांच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले आहे की, सुरुवातीला जेव्हा ते वडापावच्या दुकानाबद्दल कोणाशी बोलायचे तेव्हा लोक त्यांना म्हणायचे, ‘क्या गोली दे राहा है?’ मुंबईत लोकल भाषेत अशाच पद्धतीचे बोलले जाते. येथूनच त्यांना त्यांच्या दुकानाच्या नावाची कल्पना सुचली. CST रेल्वे स्टेशनच्या बाहेर व्यंकटेश यांनी मॅकडोनाल्डचा 40 फूट लांब बॅनर पाहिला होता. यावेळी त्यांच्या मनात एक प्रश्न आला की इथे परदेशी बर्गर इतके प्रसिद्ध असू शकतात तर देशी वडा पाव का नाही. यानंतर त्यांनी हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. वेंकटेश यांनी 2004 मध्ये ठाण्यात आपले पहिले दुकान सुरू केले.

हेही वाचा – कोणत्या कारणांमुळे चेक बाऊन्स होतो? किती दंड लागतो? केस कधी होऊ शकते?

गोली वडा पावबद्दल एक खास गोष्ट म्हणजे, ज्यांनी 10वी पर्यंत किंवा त्यापूर्वी कोणत्याही कारणास्तव शाळा सोडली अशा लोकांना कंपनीने कामावर ठेवले आहे. आर्थिक कारणांमुळे स्वत: शाळेत जाऊ न शकलेल्या अशा मुलांच्या शिक्षणासाठीही व्यंकटेश कार्यरत आहेत. कंपनीच्या कोरमध्ये ‘थ्री E’चा ठळकपणे समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ शिक्षण, रोजगार आणि उद्योजकता. इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्याकडून मी प्रेरणा घेतलीय, असे व्यंकटेश सांगतात.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment