Gold Silver Price Today : सोने 60,000 रुपयांच्या वर..! चांदीही महाग; जाणून घ्या आजचा दर

WhatsApp Group

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या वायदा किमतीला आज तेजीने सुरुवात झाली. सोने 153 रुपयांनी तर चांदी 201 रुपयांनी वाढले. सोन्याचे दर 60 हजारांच्या वर तर चांदीचे दर 77 हजारांच्या वर चालू आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, बेंचमार्क सोन्याचा जून करार 60,783 रुपयांवर उघडला, तर मागील बंद किंमत 60,628 रुपये प्रति 10 ग्रॅम होती.

वृत्त लिहिपर्यंत हा दर 257 रुपयांच्या वाढीसह 60,885 रुपयांवर व्यवहार करत होता. या टप्प्यावर तो रु.60,894 या दिवसाचा उच्चांक आणि रु.60,676 या दिवसाचा नीचांकावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात, या दराने 61,845 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महागलं..! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

चांदीचे भावही वाढले

सोन्याबरोबरच आज चांदीच्या भावातही वाढ दिसून आली. सोमवारी, बेंचमार्क चांदीचा जुलै कॉन्ट्रॅक्ट MCX वर 77,248 रुपयांवर उघडला, जो आधीच्या 77,041 रुपयांच्या बंद भावापेक्षा 201 रुपयांनी वाढला. चांदीचा दर 308 रुपयांच्या वाढीसह 77,355 रुपयांवर व्यवहार करत होता. यावेळी तो दिवसभरातील उच्चांकी रु.77,378 आणि दिवसाचा नीचांक रु.77,198 प्रति किलो या पातळीवर पोहोचला. गेल्या आठवड्यात चांदीच्या भावाने प्रतिकिलो 78 हजार रुपयांच्या पुढे उच्चांक गाठला होता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment