Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या किमतीतील वाढ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गुरुवारी सोने उच्चांकावर पोहोचले. आता आज चांदीच्या किमतीने नवीन सार्वकालिक उच्चांक पातळी निर्माण केली आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात, एमसीएक्स एक्सचेंजवर 5 जून रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 61,502 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सुरुवातीच्या व्यवहारात, सोन्याची फ्युचर्स किंमत 61,629 रुपयांवर गेली. गुरुवारी सोन्याचा देशांतर्गत वायदा भाव 61,845 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला होता. ही सोन्याची उच्च पातळी आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही बंपर तेजी पाहायला मिळत आहे. चांदीच्या वायदेने आज नवा उच्चांक गाठला.
का वाढतोय भाव?
सोन्या-चांदीच्या किमती वाढण्याचा थेट संबंध अमेरिकेशी आहे. अमेरिकेतील वाढत्या व्याजदराचा हा परिणाम आहे. यूएस सेंट्रल बँकेने बुधवारी रात्री प्रमुख व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. त्याच वेळी, अमेरिकेतील वाढत्या बँकिंग संकटामुळे अमेरिकन डॉलरमध्ये घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किमती वाढण्यास बळ मिळत आहे.
हेही वाचा – IPL 2023 : काय कॅच घेतलाय..! हवेत डाय टाकत मार्करमने टिपला अफलातून झेल; पाहा Video
चांदीचा उंच्चांक
चांदीच्या देशांतर्गत वायदा किमतींनी शुक्रवारी नवीन उच्चांक गाठला. एमसीएक्सवर 5 जुलै रोजी डिलिव्हरीसाठी चांदी सकाळपासून चांगल्या वाढीसह व्यवहार करत आहे. व्यवसायादरम्यान तो 78,292 रुपये प्रति किलोवर गेला. ही त्याची नवीन सर्वकालीन उच्च पातळी आहे.
जागतिक बाजारात सोन्याची किंमत
शुक्रवारी सकाळी सोन्याच्या जागतिक किमतीत थोडीशी घसरण झाली. कॉमेक्सवर, सोन्याची जागतिक वायदा किंमत 0.01 टक्क्यांनी किंवा $ 0.30ने कमी होऊन $2,055.40 प्रति औंसवर व्यापार करत होती. त्याच वेळी, सोन्याची जागतिक स्पॉट किंमत 0.12 टक्क्यांनी किंवा $2.43 ने घसरून $2,047.85 प्रति औंस झाली.
जागतिक बाजारात चांदीची किंमत
कॉमेक्सवर चांदीची जागतिक स्पॉट किंमत 0.26 टक्क्यांनी किंवा 0.07 डॉलर प्रति औंस $26.30 वर व्यापार करत होती. त्याच वेळी, चांदीची जागतिक स्पॉट किंमत 0.22 टक्क्यांनी किंवा $0.06 ने घसरून $25.99 प्रति औंस झाली.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!