Gold Silver Price Today : या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमतीत नरमाईने सुरुवात झाली, तर आधीच्या आठवड्यात दोन्हीच्या किमतीत वाढ झाली. सोन्याच्या भावाने 60 हजार आणि चांदीच्या भावाने 70 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. सोमवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा एप्रिलचा करार 59,300 रुपयांवर उघडला, जो आधीच्या 59,273 रुपयांच्या बंद किमतीच्या तुलनेत 27 रुपये प्रति 10 ग्रॅमने जास्त होता. मात्र, ही तेजी अल्पकाळ टिकली. बातमी लिहीपर्यंत तो दिवसभरातील नीचांकी 59,031 रुपयांवर पोहोचला आणि 232 रुपयांनी घसरून 59,041 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता. गेल्या आठवड्यात सोमवारी हा करार 60,455 रुपये प्रति 10 ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता.
चांदीही घसरली
सोन्याबरोबरच चांदीच्या भावातही आज नरमली. सोमवारी, MCX वर चांदीचा दर 70,251 रुपये प्रति किलोवर उघडला, गेल्या महिन्यात चांदीचा भाव 72,000 रुपये प्रति किलोवर गेला होता. मात्र, यानंतर किमती झपाट्याने घसरल्या आणि 62,000 रुपये प्रति किलोच्या जवळ आल्या.
हेही वाचा – SBI Recruitment 2023 : स्टेट बँकेत ‘मोठी’ भरती..! पगार ४०-४५ हजार; ‘असा’ भरा अर्ज!
तुमच्या शहरात सोन्याचा दर किती?
तुम्हाला घरी बसून सोन्याची किंमत जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. तुम्ही मिस्ड कॉल देताच तुमच्या फोनवर मेसेजद्वारे तुम्हाला सोन्या-चांदीची किंमत कळेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!