Gold Silver Price Today : आज बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ दिसून आली. तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर महागडा दर ऐकून तुम्हाला धक्का बसेल. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. यापूर्वी, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दर 60,000 रुपयांच्या पुढे गेला होता. बुधवारी एमसीएक्सवर सोने आणि चांदीमध्ये संमिश्र कल दिसून आला. दुसरीकडे सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंचे दरही वाढले आहेत.येत्या काळात सोने 65 हजारांच्या पुढे जाऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यात सोने 55,000 रुपयांपर्यंत घसरले. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या वाढीबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. काही महिन्यांत चांदी 80,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.
हेही वाचा – उष्णतेपासून वाचण्यासाठी कारवर शेणाचा लेप..! खरंच असं होतं का? जाणून घ्या!
बुधवारी MCX वर संमिश्र कल
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बुधवारी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये संमिश्र कल दिसून आला. बुधवारी दुपारी सोन्याचा भाव 21 रुपयांनी घसरून 60240 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 230 रुपयांनी वाढून 74493 रुपये प्रति किलोवर होता. याआधी मंगळवारी सोन्याचा भाव 60261 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74263 रुपयांवर बंद झाली होती.
सराफा बाजारात तेजी होती
इंडिया बुलियन्स असोसिएशन (https://ibjarates.com) द्वारे सराफा बाजार दर दररोज जारी केले जातात. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 300 रुपयांहून अधिक वाढून 60434 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला. बुधवारी चांदीच्या दरातही वाढ झाली आणि तो 74315 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचला. त्याच दिवशी 23 कॅरेट सोन्याचा भाव 60192, 22 कॅरेट सोन्याचा भाव 55358 रुपये आणि 20 कॅरेट सोन्याचा भाव 45326 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!