Gold Silver Price Today : दागिने बनवणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते, मात्र सोन्या-चांदीचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांना दागिने बनवता येत नाहीत. आज सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली असून, आज तुमच्यासाठी दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर
22 कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत रु. 56,100, मुंबई सराफा बाजारात रु. 55,950, कोलकाता सराफा बाजारात रु. 55,950 आणि चेन्नई सराफा बाजारात रु. 56,500 आहे.
हेही वाचा – IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरचं आयपीएल पदार्पण! सचिन म्हणतो, “एका सुंदर प्रवासाची सुरुवात…”
24 कॅरेट सोन्याचा दर
24 कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत रु. 61,190, मुंबई सराफा बाजारात रु. 61,040, कोलकाता सराफा बाजारात रु. 61,040 आणि चेन्नई सराफा बाजारात रु. 61,640 आहे.
चार महानगरांमध्ये चांदीचा भाव
चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली सराफा बाजारात 01 किलो चांदीची किंमत रु.78,500 आहे, मुंबई सराफा बाजारात आणि कोलकाता सराफा बाजारात देखील चांदीची किंमत रु.78,500 आहे, तर चेन्नई सराफा बाजारात किंमत रु.81,500 आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!