Gold Silver Price Today : भारतात सोने-चांदी महागले..! वाचा आजचा 10 ग्रॅमचा दर

WhatsApp Group

Gold Silver Price Today : जागतिक बाजारातील उलथापालथीमुळे कमोडिटी बाजारात जोरदार चढउतार होताना दिसत आहे. अमेरिकेत मंदीच्या बातम्यांमुळे सोन्याच्या किमतीला पुन्हा एकदा आधार मिळत आहे. त्यामुळे भारतीय बाजारातही सोने महाग झाले आहे. देशांतर्गत वायदा बाजारात सोने 125 रुपयांनी महागले. एमसीएक्सवर चांदी 257 रुपयांनी महागली आहे. व्याजदरांबाबत FED चा निर्णय हे किमती वाढण्याचे कारण आहे.

सोन्याचे भाव का वाढत आहेत?

आंतरराष्ट्रीय बाजारात, कोमॅक्सवर सोने प्रति औंस $ 2031 या दराने व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीचा भावही प्रति औंस 25.63 डॉलरवर पोहोचला आहे. किंबहुना, अमेरिकेत महागाईच्या आकडेवारीत घट नोंदवली गेली आहे. यूएस फेड आगामी बैठकीत व्याजदरातील वाढ थांबवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाचा ८७ डॉलरचा टप्पा पार, तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेल दर तपासा

10 ग्रॅम सोन्याची किंमत किती?

भारतीय कमोडिटी मार्केटमध्ये, MCX वर सोने 60751 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने व्यवहार करत आहे. तसेच चांदीचा भावही 76200 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. IIFL सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांच्या मते, MCX वर सोन्याचे जून फ्युचर्स 60850 पर्यंत जाऊ शकतात. चांदीचा भाव 77000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतो. केडिया कमोडिटीजचे प्रमुख अजय केडिया यांच्या मते, सोने खरेदी करण्याची अनेक कारणे आहेत. कारण चलनवाढ आणि बाजारातील अस्थिरता यांच्यामध्ये सोने ही सुरक्षित गुंतवणूक आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर

IBJA म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत 6061 रुपये प्रति ग्रॅम आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव 5916 रुपये, 20 कॅरेट सोन्याचा भाव 5395 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा भाव 4910 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 3910 रुपये आहे. 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 74940 रुपये प्रति किलो आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment