Gold Price : सोने खरेदी करणाऱ्यांची लॉटरी..! 10 ग्रॅमवर होतोय ‘इतका’ फायदा; वाचा!

WhatsApp Group

Gold Price : अक्षय्य तृतीया हा सण उद्या म्हणजेच शनिवारी (22 एप्रिल) आहे. जर तुम्ही गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केले असेल तर ही बातमी वाचून तुम्हाला आनंद होईल. या प्रसंगी सोने खरेदी करणे भारतात शुभ मानले जाते. गेल्या वर्षी सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी झाली आहे. सोन्याने केवळ एका वर्षात 20 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. 2023 मध्येही सोने खरेदीवर 12 टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी हा सण 3 मे रोजी साजरा करण्यात आला होता.

एका वर्षात 10000 रुपयांपेक्षा जास्त वाढ

3 मे 2023 रोजी MCX वर सोन्याचा दर 50800 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 20 एप्रिल रोजी बंद झालेल्या ट्रेडिंग सत्रात तो 60,503 रुपयांपर्यंत चढला. 13 एप्रिल रोजी ही विक्रमी पातळी 60,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचली होती. त्याचप्रमाणे सराफा बाजारात गुरुवारी भाव 60616 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. अशाप्रकारे गेल्या वर्षभरात सोन्याचे दर 10000 रुपयांनी (सुमारे 20 टक्के) वाढले आहेत.

हेही वाचा – आजपासून ‘या’ शाळांना सुट्टी जाहीर..! वाढत्या उष्णतेमुळे महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

रेपो दरात 2.50 टक्के वाढ

मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालानुसार, गेल्या 10 वर्षांत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीतून सुमारे 11% परतावा मिळाला आहे. पण 2022 मध्ये जागतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात प्रचंड रस दाखवला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रशिया आणि युक्रेन युद्धाशिवाय चीन-तैवान युद्ध सुरूच आहे. जागतिक पातळीवर महागाई कायम आहे. देशातील वाढती महागाई रोखण्यासाठी RBI ने मे 2022 पासून आतापर्यंत रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment