

Indore : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भिकाऱ्यांना भिक्षा देणे महागात पडू शकते. भिक्षा देणाऱ्यांवर एफआयआर नोंदवला जाईल. हा नवा नियम 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. शहराला भिकाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी इंदूर पोलिसांनी हे नियम केले आहेत. या अंतर्गत इंदूरमध्ये भीक मागण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून सध्या शहरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, डिसेंबर अखेरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
1 जानेवारीनंतर एखादी व्यक्ती भिक्षा देताना आढळून आल्यास त्याच्याविरुद्धही एफआयआर नोंदवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इंदूरच्या जनतेने देऊन पापाचे साथीदार होऊ नका, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत प्रशासनाने लोकांना भीक मागण्यास भाग पाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
🚨 From January 1, 2025, residents found giving alms to beggars will face legal action in Indore. pic.twitter.com/aCXYTFzEcu
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) December 17, 2024
हेही वाचा – GST : जुन्या गाड्यांच्या किंमती महागणार, झोमॅटो-स्विगीवरून खाद्यपदार्थ मागवणे स्वस्त होणार!
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशातील 10 शहरांना भिकाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. या शहरांच्या यादीत इंदूरच्या नावाचाही समावेश आहे. यानंतर या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी इंदूर जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
या मालिकेत इंदूर पोलिसांनी नुकतीच शहराला भिकाऱ्यापासून मुक्त करण्यासाठी एक टीम तयार केली असून 14 भिकाऱ्यांना अटक केली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी पकडलेल्या भिकाऱ्यांमध्ये राजवाड्यातील शनी मंदिराजवळ भीक मागणाऱ्या महिलेकडून 75 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. अवघ्या 10-12 दिवसांत ही रक्कम जमा झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!