भारतातील रस्त्यावर भाजीपाला खरेदी करतोय जर्मनीचा मंत्री, व्हिडिओ व्हायरल!

WhatsApp Group

UPI Payment : भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची व्याप्ती म्हणजे UPI सतत वाढत आहे, जगातील सर्व देशांमध्ये त्याचा वापर केला जात आहे. भारत सरकार देखील UPI ला त्यांची सर्वात मोठी उपलब्धी मानते. भारताचा UPI लाइक करणाऱ्यांच्या यादीत जर्मनीचाही समावेश झाला आहे. G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेले जर्मनीचे डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग यांनी ही भारताची यशोगाथा असल्याचे म्हटले आहे.

जर्मन मंत्र्यांची भाजीपाला खरेदी

जर्मनीचे केंद्रीय डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग यांनी UPI वापरून पेमेंट सुलभतेचा अनुभव घेतला आणि ते त्याचे चाहते झाले. विसिंग 19 ऑगस्ट रोजी बंगळुरूमध्ये G20 डिजिटल मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते आणि दुसऱ्या दिवशी रविवारी बंगळुरूच्या भाजी मंडईतून भाजी खरेदी केली आणि UPI द्वारे पैसे दिले. जर्मन मंत्र्याचा भाजी खरेदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा – ‘येथे’ पाहा चांद्रयान-3 चे लँडिंग LIVE..! इस्रोने सांगितली बदललेली नवीन वेळ

भारतातील जर्मन दूतावासाने X (Twitter) वर केलेल्या ट्वीटद्वारे UPI ची लोकप्रियता आणि वापराचे खूप कौतुक करण्यात आले. दूतावासाच्या ट्वीटमध्ये भारताच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची प्रशंसा करताना, यूपीआय ही देशाच्या यशोगाथांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. जर्मनीचे डिजिटल आणि वाहतूक मंत्री, वोल्कर विसिंग हे UPI वापरून प्रभावित झाले. ते म्हणाले की हे खूप यूजर फ्रेंडली आहे आणि व्यवहार किती लवकर पूर्ण झाला याबद्दल मला आश्चर्य वाटले. UPI खूप सुरक्षित आहे आणि मला विश्वास आहे की माझे पैसे सुरक्षित आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment