दिल्ली हादरली..! तरुणाकडून आई-वडील, आजी आणि बहिणीची हत्या

WhatsApp Group

Delhi Palam Crime News : दिल्लीतील पालम भागात एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. देशाची राजधानी पालम परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चाकूने वार करण्यात आलेल्यांमध्ये आरोपीचे आई-वडील, आजी आणि बहिणीचा समावेश आहे. या चारही हत्याकांडातील आरोपी तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी रात्री हे सर्वजण घरात झोपलेले असताना त्यांची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये या घटनेशी संबंधित काही छायाचित्रे समोर आल्याचे बोलले जात आहे. या फोटोंमध्ये तरुणाने बहिणीची खोलीत हत्या केल्याचे दिसून येते. खोलीत त्याचा मृतदेह पडून आहे. तर आजी बेडवर मृतावस्थेत पडल्या आहेत. त्याचवेळी घरात आणखी दोन जणांचे मृतदेह सापडले असून पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीने ही निर्घृण हत्या का केली? ही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

हेही वाचा – Viral Video : जेलमध्ये हॉटेलचं चमचमीत जेवण..! मंत्री सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की घरातील मुलाने आई-वडील, बहीण आणि आजीची चाकूने हत्या केली आहे. त्याला कशाचा तरी राग आला आणि त्यामुळेच त्याने ही हत्या केल्याचे बोलले जात आहे. चार खून केल्यानंतर हा मुलगा घराबाहेर पडला नाही आणि मृतदेहाजवळ बसून राहिला, असेही सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांना खुनाची माहिती मिळाली होती. मीडिया रिपोर्टमध्ये असेही बोलले जात आहे की या मुलाला ड्रग्जचे व्यसन होते. मात्र, घरच्या मुलाने एवढे कठोर पाऊल का उचलले? याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Leave a comment