रसना कंपनीचे संस्थापक अरीज पिरोजशॉ खंबाटा यांचे निधन

WhatsApp Group

Founder of Rasana Ariz Pirojshaw Khambata Death : रसना ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष अरीज पिरोजशॉ खंबाटा यांचे निधन झाले आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ८५ वर्षीय खंबाटा यांचे शनिवारी निधन झाले. ते अरीज खंबाट्टा बेनेव्होलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्षही होते.

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, खंबाटा WAPIZ (वर्ल्ड अलायन्स ऑफ पारसी इराणी जरथोस्ती) चे माजी अध्यक्ष आणि अहमदाबाद पारसी पंचायतीचे माजी अध्यक्ष देखील होते. खंबाटा यांनी भारतीय उद्योग, व्यापार आणि समाजाच्या सेवेद्वारे सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

हेही वाचा – Video : इंडोनेशिया हादरलं..! भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळं ४६ लोकांचा मृत्यू; ७०० जण जखमी

खंबाटा हे लोकप्रिय घरगुती पेय ब्रँड रसनासाठी प्रसिद्ध आहे, जे देशातील १८ लाख रिटेल आउटलेटमध्ये विकले जाते. रसना ही आता जगातील सर्वात मोठी सॉफ्ट ड्रिंक उत्पादक कंपनी आहे. हा Sana Pioma Industries च्या मालकीचा एक पेय ब्रँड आहे आणि त्याचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात येथे आहे. हे सत्तरच्या दशकाच्या मध्यात लॉन्च केले गेले होते परंतु ऐंशीच्या दशकात लोकप्रियता मिळवली. यावेळी थम्स अप, गोल्ड स्पॉट, लिम्का या कार्बोनेटेड शीतपेयांची बाजारात जोरदार चलती होती. असे असूनही ब्रँडने भारतात आपले स्थान निर्माण केले आहे. २००९ पर्यंत, भारतातील सॉफ्ट ड्रिंक कॉन्सन्ट्रेट मार्केटमध्ये रसनाचा ९३ टक्के हिस्सा होता. २०११ पर्यंत कंपनीची उलाढाल ३.५ अब्ज रुपये झाली होती.

Leave a comment