VIDEO : अक्षय कुमारच्या ‘रामसेतू’चा टीझर रिलीज..! पाहून सांगा दमदार वाटतो का

WhatsApp Group

Akshay Kumars RamSetu : अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राम सेतूची पहिली झलक समोर आली आहे. अक्षय कुमारने राम सेतू चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि टीझर घेऊन चाहत्यांना मोठी ट्रीट दिली आहे. राम सेतूचा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज झाला आहे. २५ ऑक्टोबर रोजी रिलीज होणारा चित्रपटाचा टीझर, राम सेतूच्या रहस्यमय जगाचा फेरफटका मारतो. टीझरला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शंखांच्या आवाजाने सुरू होणारा आणि जय श्री रामने संपणारा हा टीझर दमदार आहे. अक्षय कुमार राम सेतू वाचवण्यासाठी निघाला आहे. हा ऐतिहासिक पूल वाचवण्यासाठी त्यांच्याकडे अवघे तीन दिवस आहेत. राम सेतू धोक्यात का आहे, खिलाडी कुमार आपल्या मिशनमध्ये यशस्वी होणार का, राम सेतूमागे कोण आहेत शत्रू? असे असंख्य प्रश्न आहेत, जे राम सेतूचा टीझर तुमच्या मनात निर्माण करतो. या प्रश्नांची उत्तरे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मिळतील.

हेही वाचा – भीषण अपघात..! IIT विद्यार्थ्यांची बस ५०० फूट दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू!

राम सेतू हा अॅक्शन साहसी चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन अभिषेक शर्माने केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा, सत्य देव हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा एका पुरातत्वशास्त्रज्ञाभोवती फिरते. जी राम सेतू पुलाची रिअॅलिटी चेक करताना समोर आली आहे. अक्षय यात पुरातत्वशास्त्रज्ञ आहे. अक्षय कुमारनेही चित्रपटासाठी आपला लूक बदलला आहे. हा चित्रपट भारतीय संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा सांगणारा आहे.

२०२२ मध्ये प्रदर्शित होणारा राम सेतू हा पाचवा चित्रपट आहे. याआधी त्यांचे तीन चित्रपट थिएटरमध्ये आणि एक चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. अक्षयचे बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन वाईटरित्या फ्लॉप झाले. ओटीटीवरील कठपुतलीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बॅक टू बॅक फ्लॉप देणारा खिलाडी कुमार आता पुन्हा एकदा नव्या कथेसह थिएटरमध्ये परतत आहे. राम सेतू चित्रपटातून अक्षय कुमार बॉक्स ऑफिसचा बादशाह बनतो की पुन्हा चुकतो, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. सर्वांच्या नजरा राम सेतूच्या रिलीजवर आणि बॉक्स ऑफिसवर आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment