Fire Incident In Maldives : मालदीवची राजधानी माले येथून एक वाईट बातमी आली आहे. माले येथील परदेशी कामगारांसाठी बांधलेल्या घरांना आज म्हणजेच गुरुवारी भीषण आग लागली, ज्यात १० जण जिवंत जळून खाक झाले. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १० जणांमध्ये ९ भारतीय कामगारांचा समावेश आहे, तर आणखी एक मृत बांगलादेशचा रहिवासी आहे. या आगीच्या घटनेत काही जण जखमीही झाले आहेत.
आगीत नष्ट झालेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून १० मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या इमारतीच्या तळमजल्यावर गॅरेज असल्याचे सांगण्यात आले आणि त्यात आग लागल्यानंतर संपूर्ण इमारत आपल्या विळख्यात आली आणि बघता बघता आगीचे फुगे आकाशात उडाले आणि सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला. मृतांमध्ये नऊ भारतीय आणि एका बांगलादेशीचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Maldives caught up in fire…
10 dead, out of which 9 are indians.#Maldives pic.twitter.com/WD4xP6fdfR
— Pratibha (@pratibharathi18) November 10, 2022
हेही वाचा – IND Vs ENG Semifinal : इंग्लंडनं जिंकला टॉस..! रोहितच्या मनासारखा निर्णय; वाचा Playing 11
मालदीव में बड़ा हादसा, इमारत में आग लगने से 9 भारतीयों समेत 10 लोगों की मौत #Maldives #Fire pic.twitter.com/SIieM8O5p2
— Jatin Madan (@jatin_madan) November 10, 2022
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे चार तास लागले. दरम्यान, मालदीवमधील भारतीय हायकमांडने या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितले की, माले येथे लागलेल्या भीषण आगीच्या घटनेमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे, ज्यामध्ये भारतीय नागरिकांसह अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आम्ही मालदीव अधिकाऱ्यांच्या जवळच्या संपर्कात आहोत.