गूगल पे, फोन पे म्हणजे UPI साठी शुल्क लागणार? वाचा काय खरं नी काय खोटं!

WhatsApp Group

UPI Charges : UPI व्यवहारांवरही आकारलं जाणार शुल्क! UPI द्वारे होणारे व्यवहार महागणार! आता UPI ही मोफत सेवा नाही, तुम्हीही सोशल मीडियावर याबद्दल काही वाचलं असेल किंवा लोकांकडून असे काही ऐकले असेल, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. होय, सरकार UPI पेमेंटवर शुल्क आकारणार आहे, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. आता अर्थ मंत्रालयानं पुढं येऊन या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे आणि एकामागून एक ट्वीट करून ही माहिती दिली आहे. अर्थ मंत्रालयानं दिलासा देणारी माहिती दिली आहे. वित्त मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे, की सरकार UPI पेमेंट सेवेवर कोणत्याही प्रकारचं शुल्क लावण्याचा विचार करत नाही.

खरंच UPI पेमेंटवर शुल्क लागणार?

अर्थ मंत्रालयानं ट्वीट केलं, की UPI हे असे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे लोकांसाठी अत्यंत सोयीचं आहे आणि अर्थव्यवस्थेत त्याचं मोठं योगदान आहे. UPI पेमेंट सेवेवर कोणतेही शुल्क आकारण्याचा सरकार विचार करत नाही. सेवा पुरवठादारांसाठी खर्च वसुलीसाठी इतर पर्यायांचा विचार केला जाईल. डिजिटल पेमेंट इको सिस्टीम मजबूत करण्यासाठी सरकारनं गेल्या वर्षी आर्थिक मदत जाहीर केली होती. यंदाही ही मदत सुरूच राहणार आहे.

हेही वाचा – इनकम टॅक्सवाल्यांनी मारला कडक माल? मजूराला पाठवली ३७.५ लाखांची नोटीस!

UPI म्हणजे काय?

रिअल टाइम पेमेंट सिस्टम म्हणजेच UPI, जी एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात लगेच पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. सगळ्यात भारी म्हणजे, तुम्ही UPI द्वारे पैसे कधीही, रात्री किंवा दिवसा ट्रान्सफर करू शकता. गूगल पे, फोन पे, पेटीएम हे अॅप तुम्ही वापरत असाल, तेच UPI आहे.

लोकांचा UPI चा खूप

NPCI नं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात दर महिन्याला UPI पेमेंट वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. केवळ जुलै महिन्यातच देशात एकूण ६०० कोटींचे व्यवहार झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. यामध्ये एकूण १०.२ लाख कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. देशातील UPI वापरकर्त्यांचा दर ७ टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

हेही वाचा – तरुणांनो खूप दारू प्या..! जपान सरकारनं केलंय आवाहन; ‘हे’ आहे कारण!

रिझर्व्ह बँकेच्या सल्लामसलतीमुळं वादाला तोंड

काही दिवसांपूर्वी, रिझर्व्ह बँकेनं UPI पेमेंट आणि शुल्काबाबत लोकांकडून फीडबॅक मागवला होता. यासाठी सल्लापत्रही शेअर करण्यात आले. यामुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला, की सरकार UPI देखील चार्ज करणार आहे, परंतु आता अर्थ मंत्रालयानं यावर सर्व काही स्पष्ट केले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment