MS Swaminathan Passes Away : भारताच्या हरित क्रांतीचे जनक मानले जाणारे एमएस स्वामीनाथन यांचे गुरुवारी वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. एमएस स्वामीनाथन यांनी भाताच्या उच्च-उत्पादक जाती विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन दिले. स्वामीनाथन यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध खात्यांमध्ये विविध पदे भूषवली. त्यांना भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक (1961-72), ICAR चे महासंचालक आणि भारत सरकारच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव (1972-79), कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव (1979) म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते.
जगातील प्रसिद्ध टाइम मासिकाने 20व्या शतकातील सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांच्या यादीत फक्त तीन भारतीयांचा समावेश केला. यात रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी आणि एम.एस. स्वामीनाथन होते. स्वामीनाथन यांना 1987 मध्ये पहिला जागतिक अन्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान म्हणून याकडे पाहिले जाते. त्यांना HK फिरोदिया पुरस्कार, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार आणि इंदिरा गांधी पुरस्कारासह रॅमन मॅगसेसे पुरस्कार आणि अल्बर्ट आईनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार यासारखे आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.
हेही वाचा – Cement Price Hike : घर बांधणाऱ्यांनो, ही माहिती तुमच्यासाठी! 1 ऑक्टोबरपासून…
स्वामीनाथन हे प्रसिद्ध कृषीशास्त्रज्ञ आणि वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ होते. धानाच्या अधिक सुपीक जाती विकसित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा हा शोध कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक क्रांतीच होता. स्वामिनाथन आणि त्यांचे अमेरिकन शास्त्रज्ञ सहकारी नॉर्मन बोरलॉग यांना 1960 च्या दशकात भारताला दुष्काळापासून वाचवण्याचे श्रेय जाते. भारत सरकारनेही त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन गौरविले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी चेन्नईत स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!