धक्कादायक..! माशाचा काटा खाल्ल्यामुळं व्यक्तीचा वेदनादायक मृत्यू

WhatsApp Group

Farmer Swallowed Bone Of Fish : एका शेतकऱ्याने चुकून १ इंच लांब माशाचा काटा गिळा. या हाडामुळे त्याच्या आतड्याला छिद्र पडले आणि तो धोकादायक संसर्गाचा बळी ठरला. हा संसर्ग जीवघेणा ठरला आणि रुग्णाचा मृत्यू झाला. ही घटना श्रीलंकेत उघडकीस आली. माशाचा काटा खाऊन मृत्यू झाल्याची घटना ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी केस रिपोर्ट्स’मध्ये प्रसिद्ध झाली आहे. श्रीलंकेत राहणाऱ्या रुग्णाचे वय ६० वर्षे होते. त्या व्यक्तीला वेदना, उलट्या, बद्धकोष्ठता आणि वाढलेले ओटीपोट यासह रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांची प्रकृती पाहून त्यांना ‘अतिदक्षता’मध्ये दाखल करण्यात आले. अनेक तपासण्या करण्यात आल्या, या अहवालातून त्याच्या पोटात द्रव भरल्याचे समोर आले. जेव्हा मूत्रपिंड काम करणे थांबवतात तेव्हा अशी लक्षणे उद्भवतात. हे मुख्यत्वे ‘सेप्सिस’चे लक्षण आहे. सेप्सिसमध्ये, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अवयवांवरच हल्ला करते.

हेही वाचा – विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ आता OTT प्लॅटफॉर्मवर..! कधी आणि कसा पाहता येईल? वाचा!

यानंतर, रुग्णाचे ऑपरेशन दोन तास चालले, आतड्यात एक लहान छिद्र असल्याचे समोर आले. १ इंच माशाचा काटा गिळल्यामुळे हा प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले. रुग्णाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी आतड्याचा संसर्ग झालेला भाग काढून टाकला. परंतु, हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णाचा मृत्यू झाला.

डॉक्टर म्हणाले…

अभ्यासानुसार, माशांची हाडे गिळल्याने पोटात अशा समस्या निर्माण होतात. या अभ्यासाबाबत एम्सचे डॉक्टर विप्लब कुमार मिश्रा म्हणाले, की अशी प्रकरणे सामान्य आहेत. विशेषत: किनारपट्टीच्या भागात, जेथे लोक दररोज मासे खातात. दुसरीकडे, अशा केसेस लवकर आढळून आल्यास उपचार शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. परंतु, उपचारास उशीर झाल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment