कुटुंबानं १८ महिने घरात ठेवला मृतदेह..! लोकांना सांगायचे, “ते कोमात आहेत”

WhatsApp Group

Dead Body In The House For 18 Months : उत्तर प्रदेशातील कानपूरमधील रावतपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक कुटुंब गेल्या दीड वर्षांपासून मृतदेहासोबत राहत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुटुंबाचा सदस्य अजूनही जिवंत असल्याचा त्यांचा विश्वास होता. खरं तर, एप्रिल २०२१ मध्ये, गुजरातमधील आयकर विभागात अधिकारी म्हणून तैनात असलेले कानपूरचे विमलेश कुमार यांचे रावतपूर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्यू प्रमाणपत्रही मोती हॉस्पिटलने जारी केले होते. १८ महिने उलटूनही नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले नाहीत. त्यांनी मृतदेह घरी ठेवला आणि विमलेश यांना जिवंत समजून घरीच उपचार करत होते.

विमलेश हे गुजरातमध्ये आयकर विभागात होते. सतत दीड वर्षे ते ड्युटीवर रुजू झाले नाहीत तेव्हा कानपूरच्या सीएमओला या प्रकरणाची चौकशी करण्यास लेखी सांगण्यात आले. रावतपूर येथील आरोग्य विभागाचे पथक विमल दीक्षित यांच्या घरी पोहोचले असता कुटुंबीय मृतदेह हलत येथे नेऊन तपासणी करून घेण्यावर ठाम होते. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

हेही वाचा – तिरुपती बालाजीची संपत्ती किती? प्रॉपर्टी, सोन्याची आकडेवारी जाहीर; वाचून थक्क व्हाल!

विमलेश यांच्या कुटुंबीयांनी गेल्या दीड वर्षांपासून त्यांचा मृतदेह घरी ठेवला होता. लोकांना सांगायचे की विमलेश कोमात आणि आजारी आहेत. आज आरोग्य विभागाचे पथक पोहोचले तेव्हा विमलेश यांचे संपूर्ण शरीर काळवंडले होते. गुजरातमधील आयकर विभागाच्या वतीने विमलेश यांच्या सतत गैरहजर राहण्याच्या तक्रारीवरून हे संपूर्ण प्रकरण समोर आले. विमलेश यांना सतत पगार दिला जात होता पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अशा स्थितीत विभागाने तपासाची सूत्रे हाती घेतली. आयकर विभागाने कानपूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून लेखी स्वरूपात या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

एसीएमओ ओपी यांनी सांगितले, ”जेव्हा आरोग्य अधिकार्‍यांचे पथक येथे पोहोचले तेव्हा आम्हाला घरात प्रवेश दिला गेला नाही. विमलेश जिवंत असून कोमात असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. मृतदेह एका फळीवर ठेवला होता आणि वरून चादरने झाकलेला होता. आम्हाला पोलिसांना बोलवावे लागले. आमच्या टीमने तपास केला. , नंतर त्यांनी आम्हाला २२ एप्रिल २०२१ रोजी मोती हॉस्पिटलने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र दिले.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment