19 एप्रिलला लोकसभेच्या निवडणुका, 22 मे रोजी निकाल?

WhatsApp Group

Fact Check | भाजप आणि काँग्रेससह सर्व पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तयारीत व्यस्त आहेत. आता निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक 2024 होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया व्हायरल होत असलेला मेसेज आणि त्याचे सत्य.

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखेसंदर्भात सोशल मीडियावर मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये 19 एप्रिलला निवडणूक होणार असल्याचा दावा केला जात आहे. तर निकाल 22 मे रोजी लागणार आहेत. या व्हायरल मेसेजमध्ये 12 मार्चला अधिसूचना जारी होणार असून 28 मार्चपासून नामांकन सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हायरल मेसेजचे सत्य काय?

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखेबाबत व्हायरल झालेला मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने मेसेज शेअर करत म्हटले आहे की, व्हॉट्सॲपवर लोकसभा निवडणुकीचे बनावट वेळापत्रक व्हायरल केले जात आहे. संदेश पूर्णपणे बनावट आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने कोणतेही वेळापत्रक जारी केलेले नाही.

हेही वाचा – VIDEO : मोदींची खोल समुद्रात डुबकी, बुडालेल्या द्वारका नगरीला भेट!

केंद्रीय मंत्री आणि तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी यांचा लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखांबाबतचा मेसेजही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये किशनने दावा केला आहे की लोकसभा निवडणूक एप्रिल 2024 च्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. यासोबतच रेड्डी यांनी भाजपच्या विजयाचा दावाही केला आहे. ते म्हणाले, काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशात भाजप 4 जागा जिंकणार आहे. कर्नाटक भाजपच्या बाजूने असून भाजप खासदारांच्या 25 जागा जिंकणार आहे. तेलंगणातही हीच परिस्थिती आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment