

Government Scheme : महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत असून आर्थिक मदतही केली जात आहे. महिला आणि मुलींना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. अलीकडेच एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नारी शक्ती योजनेअंतर्गत सर्व महिलांना २ लाख २० हजार रुपये दिले जात असल्याचा दावा केला जात आहे.
सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये सरकार गरीब, महिला आणि गरजूंना आर्थिक मदत करत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पीआयबीने ही बातमी खरी आहे की खोटी याची सत्यता पडताळून पाहिली आहे.
पीआयबीने वस्तुस्थिती तपासली
पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘इंडियन जॉब’ नावाचे #YouTube चॅनल दावा करत आहे की केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’ (Pradhan Mantri Nari Shakti Yojana) अंतर्गत सर्व महिलांना २ लाख २० हजार रुपये देणार आहे.
हेही वाचा – Car Loan : कार लोन चुकवल्यानंतर ‘ही’ गोष्ट केली नसेल तर अडचणीत याल!
'इंडियन जॉब' नामक #YouTube चैनल द्वारा यह दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार सभी महिलाओं को 'प्रधानमंत्री नारी शक्ति योजना' के तहत 2 लाख 20 हजार रूपए देने जा रही है।#PIBFactCheck
▶️यह दावा #फर्जी है।
▶️केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं लाई गई है। pic.twitter.com/FL3Ji8Oydc
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 6, 2022
केवळ अधिकृत वेबसाइटवर विश्वास ठेवा
या दाव्यातील सत्यता जाणून घेतल्यानंतर सरकारने म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारच्या फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाही. सरकारच्या कोणत्याही योजनेची माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाइटवरच संपर्क साधा.