Free Washing Machine Scheme 2024 : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार देशात अनेक योजना राबवत आहे. काही योजनेंतर्गत दरवर्षी करोडो शेतकऱ्यांना 6000 रुपये रोख दिले जात आहेत, तर काही योजनेंतर्गत 80 कोटी लोकांना मोफत रेशनचे वाटप केले जात आहे. आता एका नव्या योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे, तिचे नाव आहे ‘फ्री वॉशिंग मशीन योजना’. सोशल मीडियावर वातावरण तापले असताना सरकारला औपचारिक निवेदन जारी करावे लागले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध माध्यमातून हा संदेश व्हायरल केला जात आहे. मोदी सरकार लवकरच देशातील महिलांना मोफत वॉशिंग मशिनचे वाटप सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर असा दावाही केला जात आहे की, या योजनेचा लाभ एक-दोन राज्यातील महिलांना नाही, तर संपूर्ण देशातील महिलांना मिळणार आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सरकारी पोर्टल प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) Factcheck ने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. आपल्या पोस्टमध्ये, पीआयबीने म्हटले आहे की यूट्यूब चॅनेल ज्ञानमंदिर ऑफिशियलने एक व्हिडिओ जारी केला आहे ज्यात दावा केला आहे की केंद्र सरकार लवकरच महिलांना वॉशिंग मशीन वितरित करणार आहे. ‘फ्री वॉशिंग मशीन स्कीम’ अंतर्गत, सरकार देशभरातील महिलांना त्याचे फायदे देणार आहे.
The video thumbnail of the YouTube Channel "gyanmandirofficials" claims that Central Govt. will distribute free washing machines to all females under the “Free Washing Machine Yojana”.#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 4, 2024
✅This claim is #fake
✅Beware of YouTube channels spreading fake news! pic.twitter.com/yenOmx6vHY
हेही वाचा – काय हे…! ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मार्नस लाबुशेनचा मैदानावर भलताच प्रकार, पाहा Video
चॅनेलचे हजारो सबस्क्राइबर्स
gyanmandirofficials या यूट्यूब चॅनलचे जवळपास 11 हजार सबस्क्राइबर्स आहेत. या चॅनलवर 8.15 मिनिटांचा व्हिडिओ टाकून मोदी सरकार आता महिलांना वॉशिंग मशीनची सुविधा देणार असल्याचे बोलले जात आहे. याचा लाभ घेण्यासाठी योग्य नोंदणी आणि हक्क सांगण्याची प्रक्रियाही व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे.
सरकारचे म्हणणे काय आहे?
PIB FactCheck ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले, ‘यूट्यूब चॅनलद्वारे पसरवल्या जात असलेल्या या खोट्यापासून सावध रहा. मोदी सरकार अशी कोणतीही योजना आणत नाही किंवा तशी घोषणाही केलेली नाही. तुम्ही सर्वांनी अशा कोणत्याही खोट्या दाव्यांमुळे दिशाभूल करू नका किंवा सोशल मीडियावर अशा बातम्या व्हायरल करू नका.’
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!