Starbucks News In Marathi : स्टारबक्स या प्रसिद्ध कॉफीहाऊस चेनच्या एका माजी कर्मचाऱ्याने इंटरनेटवर हवा केली आहे. स्टारबक्सची सर्वाधिक लोकप्रिय ड्रिंक्सची रेसिपी त्याने ऑनलाइन शेअर केली. स्टारबक्सने नोकरीवरून काढून टाकल्यानंतर या कर्मचाऱ्याने हा प्रकार केला. त्याने रेसिपी शेअर केल्यानंतर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. एका यूजरने सांगितले, ”स्टारबक्सच्या एका कर्मचाऱ्याला काढून टाकण्यात आले आहे आणि त्याने स्टारबक्सच्या सर्व पेयांच्या रेसिपी पोस्ट केल्या आहेत. तुमचे स्वागत आहे.”
शेअर केलेल्या रेसिपीमध्ये (Starbucks Employee News In Marathi) व्हाईट चॉकलेट मोचा, कोकोनट मिल्क व्हॅनिला लाटे, आइस्ड कारमेल, कोल्ड ब्रू विथ कोल्ड फोम यांचा समावेश आहे. ही पोस्ट 14 ऑक्टोबर रोजी X वर शेअर करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत याला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याला 21 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. 5 हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. तर मोठ्या संख्येने लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत.
हेही वाचा – भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर बाबर आझमच्या पप्पांनी घेतला ‘असा’ निर्णय!
एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, ”आता आम्ही स्वतःचे कूल ड्रिंक बनवू शकतो आणि स्वतःचे नाव लिहू शकतो आणि आम्ही तिला एरियन ग्रांडे किंवा काहीतरी म्हणू शकतो.” दुसरा यूजर म्हणाला, ”मी ही पोस्ट सेव्ह केली आहे पण तरीही मी माझ्या कॉफीसाठी स्टारबक्सला जाईन.” तिसरा यूजर म्हणाला, ”तुम्ही घरी बनवल्यावरही तुम्हाला स्टारबक्सची चव मिळणार नाही.”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!