

EPFO Update : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ क्लेमशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. आता पीएफच्या क्लेमसाठी सर्व कर्मचाऱ्यांना आधार अनिवार्य असणार नाही. युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) ला आधारशी जोडण्याची अट काही विशिष्ट श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना आधार बनवणे शक्य नाही, अशा कर्मचाऱ्यांना या पाऊलामुळे दिलासा मिळाला आहे. हा बदल त्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देईल, ज्यांच्यासाठी आधारशी संबंधित अडथळे आत्तापर्यंत पीएफ क्लेममध्ये अडथळा ठरत होते.
ज्या कर्मचाऱ्यांकडे आधार कार्ड नाही ते अजूनही EPFO अंतर्गत क्लेम करू शकतात. त्यांच्यासाठी पासपोर्ट, नागरिकत्व प्रमाणपत्र किंवा इतर अधिकृत ओळखपत्रांद्वारे पडताळणीचा पर्याय ठेवण्यात आला आहे. याशिवाय पॅनकार्ड, बँक खात्याचे तपशील आणि इतर निकषांद्वारे ओळखीची पडताळणी केली जाईल. ₹5 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या क्लेमच्या बाबतीत, सदस्याची सत्यता नियोक्त्याकडून पडताळून पाहिली जाईल.
हेही वाचा – जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची 27व्या वर्षी निवृत्ती; सचिन, धोनी, विराटच्या 70 पट पैसा!
कोणत्या कर्मचाऱ्यांना सूट?
ईपीएफओच्या नियमांनुसार, जर कोणत्याही कर्मचाऱ्याला पीएफ क्लेम सेटल करायचा असेल, म्हणजे पीएफमधून पैसे काढायचे असतील, तर त्याचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर आणि आधार नंबर लिंक केला पाहिजे. आता EPFO ने खालील कर्मचाऱ्यांना या नियमातून सूट दिली आहे.
- जे आंतरराष्ट्रीय कर्मचारी भारतात काम करून आपल्या देशात परतले आहेत आणि त्यांना आधार मिळू शकला नाही.
- परदेशी नागरिकत्व धारण केलेले भारतीय ज्यांना आधार मिळू शकला नाही.
- नेपाळ आणि भूतानचे नागरिक, ज्यांच्यासाठी आधार अनिवार्य असणार नाही.
- कायमस्वरूपी परदेशात गेलेले माजी भारतीय नागरिकही या सूट अंतर्गत येतात.
क्लेम प्रक्रियेचे नियम
EPFO ने अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की कोणत्याही क्लेमची काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. यानंतर, मंजूरी अधिकारी-प्रभारी (OIC) मार्फत ई-ऑफिस फाइलद्वारे मंजुरी दिली जाईल. तसेच, कर्मचाऱ्यांना समान UAN क्रमांक राखण्यासाठी किंवा त्यांचे पूर्वीचे सेवा रेकॉर्ड त्याच UAN मध्ये हस्तांतरित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे क्लेम प्रक्रिया सोपी आणि जलद होईल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!