PF Balance : जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था किंवा EPFO अंतर्गत पीएफ खाते वापरत असाल तर तुम्ही ही बातमी एकदा वाचाच. पीएफ खातेधारकांना आता त्यांचा बॅलन्स तपासण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसल्या बसल्या खालील ४ पद्धतींनी तुमचा पीएफ शिल्लक सहज तपासू शकता.
मिस कॉलद्वारे
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. यानंतर, EPFO कडून एक संदेश येईल, ज्यामध्ये तुमच्या पीएफ खात्याची माहिती मिळेल. हा कॉल UAN च्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून पाठवावा लागेल.
SMS द्वारे
जर तुमचा UAN EPFO मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही तुमच्या नवीनतम योगदानाची आणि PF शिल्लकची माहिती एसएमएसद्वारे मिळवू शकता. यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG 7738299899 वर पाठवावे लागेल. शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत. तुम्हाला हिंदीत माहिती हवी असल्यास, तुम्ही ती EPFOHO UAN HIN लिहून पाठवू शकता. हा एसएमएस UAN च्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून पाठवावा लागेल.
हेही वाचा – IND Vs NZ : काय रे रोहित..! टॉस जिंकल्यावर काय करायचं ते विसरला; पाहा Video
EPFO वेबसाइटद्वारे
- यासाठी तुम्हाला EPFA वेबसाइटवर जावे लागेल.
- येथे Employee Centric Services वर क्लिक करा.
- आता View Passbook वर क्लिक करा.
- पासबुक पाहण्यासाठी UAN सह लॉगिन करा.
उमंग अॅपद्वारे
- तुमचे उमंग अॅप (UMANG) उघडा आणि EPFO वर क्लिक करा.
- आता Employee Centric Services वर क्लिक करा.
- येथे View Passbook पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड (OTP) नंबर टाका.
- नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.
- ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही तुमची पीएफ शिल्लक तपासू शकता.