Emergency Trailer Out : कंगना रणौतचा मोस्ट अवेटेड ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर आज रिलीज झाला आहे. 14 ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर 1975 मधील भारतावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला,.राजकीय नाटकात कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
कसा आहे ‘इमर्जन्सी’चा ट्रेलर?
पहिली गोष्ट म्हणजे ट्रेलर दमदार आहेच, शिवाय अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलींद सोमण यांच्या सहभागामुळे त्याला अधिक वजन प्राप्त झाले आहे. ट्रेलरची सुरुवात कंगना राणौतच्या इंदिरा गांधींच्या व्यक्तिरेखेपासून होते.
हेही वाचा – नीरज चोप्राला ‘या’ आजाराचा त्रास, त्यामुळेच ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल हुकलं?
कंगना रणौतने ट्रेलरमध्ये इंदिरा गांधींच्या भूमिकेत चांगली व्यक्तिरेखा साकारल्याचे दिसते. इतर कलाकारांच्या पात्रांवरूनही पडदा हटवण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये इंदिरा गांधी आणीबाणी लादताना आणि त्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या दृश्यांनी भरलेला आहे. एकूण ट्रेलर पाहिल्यानंतर इमर्जन्सीबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली असेल, हे नक्की!
‘इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया’
तिच्या इंस्टाग्रामवर ट्रेलर रिलीज करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया!!!
‘इमर्जन्सी’मध्ये श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिवंगत अभिनेते सतीश कौशिक हे भारताचे माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. आणीबाणीच्या रिलीज तारीख अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. आता अखेर 6 सप्टेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!