Emergency Alert : तुम्हालाही आलाय का असा मेसेज? घाबरून जाऊ नका, कारण…

WhatsApp Group

Emergency Alert Severe Message : आज म्हणजे 20 जुलैला बहुतेक भारतीयांच्या मोबाईल फोनवर अर्लट मेसेज आला. या मेसेजमुळे अनेकांचे फोनही कडाडले. पण हा मेसेज नेमका कोणता आहे आणि तो का आला आहे, याचे उत्तर अनेकांना सापडलेले नाही. अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक एमजर्न्सी मेसेज आला. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपतकालीन अलर्ट सेवेचे चाचणी घेण्याचा मेसेज असल्याचे हे मेसेजद्वारे कळले.

या मेसेजबाबत नागरिक अनेक शक्यता व्यक्त करत आहेत. कारण आपतकालीन संदेश सेवेच्या चाचणीचा अलर्ट देण्यात येणार असल्याबाबत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय किंवा पीआयबीच्या ट्विटर हँडलवरही याबाबत काही अपडेट नाही.

हेही वाचा – Success Story : कमी वयात करोडपती, मग एका वर्षात घालवले 8600 कोटी!

या मेसेजमधील ओके बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला असे आपतकालीन मेसेज हवे आहेत का असे विचारण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार,सर्व अँड्रॉईड मोबाईलवर हा मेसेज आला असला, तरी अॅपल आयफोनवर असा कोणताही अलर्ट आलेला नाही. हा मेसेज भारतीय दूरसंचार विभागाकडून येत असल्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment