Video : टेस्लाचा सायबर ट्रक फुटला! ट्रम्प हॉटेलबाहेर स्फोट, एकाचा मृत्यू

WhatsApp Group

Cybertruck : लास वेगासमध्ये ट्रम्प हॉटेलच्या बाहेर टेस्ला सायबर ट्रकमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या अपघातात 1 जणाचा मृत्यू झाला असून 7 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या बाहेर सायबरट्रकचा स्फोट आणि न्यू ऑर्लिन्समधील हल्ल्याचा संबंध असू शकतो, असे टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी म्हटले आहे. टेस्लाच्या सायबर ट्रकमधील स्फोट हा अंतर्गत कारणांमुळे नसून बाहेरून ठेवलेल्या स्फोटकांमुळे झाला असल्याचेही मस्क यांनी म्हटले आहे.

मस्क यांना न्यू ऑर्लिन्सची घटना आणि ही घटना यांच्यात संबंध असल्याचा संशय आहे, कारण दोन्ही वाहने एकाच कार भाड्याने देणाऱ्या साइट, टूरोवरून भाड्याने देण्यात आली होती. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “या दहशतवादी घटना आहेत असे दिसते. हा सायबर ट्रक आणि न्यू ऑर्लिन्समधील एफ-150 आत्मघाती बॉम्बर हे दोघेही टुरोकडून भाड्याने घेतले होते. या दोन्ही घटना कदाचित एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत.” सीएनएनच्या रिपोर्टनुसार, न्यू ऑर्लिन्स घटनेतील संशयिताने टुरो नावाच्या साइटवरून भाड्याने घेतलेला फोर्ड एफ-150 लाइटनिंग इलेक्ट्रिक ट्रकही नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांच्या गर्दीत नेला होता.

टेस्लाचे सीईओ मस्क यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, सायबर ट्रकमधील स्फोट अंतर्गत कारणांमुळे झाला नाही. त्यांच्या मते हा स्फोट बाहेरून ठेवलेल्या स्फोटकांमुळे झाला. लास वेगासचे पोलीस अधिकारी केविन मॅकमहिल यांनी सांगितले की, हॉटेलमध्ये सकाळी 8:40 वाजता वाहनाला आग लागल्याची माहिती मिळाली.  

अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, सायबर ट्रकमध्ये स्फोटके, गॅस टँक आणि कॅम्पिंग इंधन होते. न्यू ऑर्लिन्समधील स्फोट आणि हल्ला यांच्यातील कोणत्याही संबंधाचा अधिकारी तपास करत आहेत.

न्यू ऑर्लिन्समध्ये काय घडलं?

एका संशयिताने न्यू ऑर्लिन्समध्ये गर्दीत आपली कार नेली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. शमशुद्दीन जब्बार (42) असे कार स्वार पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. एफबीआय दहशतवादी घटनेच्या कोनातून याचा तपास करत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment