Twitter Logo : ट्विटरचा लोगो बदलला, अजून बदल होणार, चिमणी गेली!

WhatsApp Group

Twitter Logo : इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो पूर्णपणे बदलला आहे. आता ट्विटरवर ब्लू बर्डच्या जागी X दिसत आहे. मस्क यांनी काल सांगितले की, ते ट्विटरचा लोगो बदलून X करणार आहे. त्यांनी ट्विटरच्या मुख्यालयावर नवीन लोगोच्या प्रोजेक्टेड फोटो देखील शेअर केला आहे.

इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी आणि चालवण्यासाठी बनवलेल्या कंपनीचे नाव X होल्डिंग्स आहे. मस्क यांनी रविवारी ट्विटरच्या ऑडिओ लाईव्हस्ट्रीमवर घोषणा केली की ते ट्विटरचा लोगो बदलणार आहेत. हे खूप आधी बदलायला हवे होते आणि उशीर झाल्याबद्दल माफी मागतो असे ते म्हणाले. यानंतर काही वेळातच त्यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या नवीन लोगोबद्दल माहिती देणारा ईमेलही पाठवला.

लोगो का बदलला?

एलोन मस्क यांनी ऑनलाइन बँकिंग स्टार्टअप सुरू केले. त्याचे नाव होते X.com. ही कंपनी नंतर दुसर्‍या कंपनीत विलीन होऊन PayPal तयार केली. मस्क यांनी गेल्या वर्षी यासंदर्भात एक ट्वीट केले होते. त्यांनी X.com सह पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी ट्विटर मदत करेल असे म्हटले होते. याशिवाय मस्क यांच्या स्पेसक्राफ्ट इंजिनिअरिंग कंपनीचे नावही स्पेसएक्स आहे. त्याचे X शी जोडणे देखील ट्विटरचा लोगो बदलण्याचे कारण बनले आहे.

हेही वाचा – मुंबईत प्रॉपर्टी खरेदी करायचीय? जाणून घ्या महत्त्वाचं अपडेट!

आणखी बदल येणार

इलॉन मस्क यांनीही ट्वीटद्वारे संकेत दिले आहेत की, ट्विटरमध्ये आणखी बरेच बदल केले जाणार आहेत. हळूहळू ट्विटर ब्रँड टप्प्याटप्प्याने संपुष्टात येईल, असे त्यांनी लिहिले आहे. त्यांनी रविवारी एका ट्वीटमध्ये म्हटले, “आणि लवकरच आम्ही ट्विटर ब्रँड सोडणार आहोत. यानंतर हळूहळू सर्व पक्ष्यांचा निरोप घेतला जाईल.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment