

Elon Musk Grok 3 : एक्स आणि स्पेसएक्स कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी एआयच्या जगात खळबळ उडवून दिली आहे. मस्क यांनी पृथ्वीवरील सर्वात हुशार एआय बनवले आहे. एलोन मस्क यांच्या एआय कंपनीने एक नवीन आणि स्मार्ट एआय चॅटबॉट ग्रॉक ३ लाँच केला आहे. एका डेमो कार्यक्रमादरम्यान, मस्क म्हणाले, “आम्हाला ग्रॉक ३ सादर करण्यास खूप उत्सुकता आहे, जे आम्हाला वाटते की ग्रॉक २ मधील एक मोठे अपग्रेड आहे. ते बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागला.
मस्क यांनी त्यांच्या टीमचे कौतुक केले आणि म्हणाले, एका उत्तम टीमसोबत काम करण्याचा मला अभिमान आहे. ग्रॉक ३ डेमो कार्यक्रमात सुमारे १००,००० लोक उपस्थित होते. दरम्यान, xAI ने काही बेंचमार्क दाखवले ज्यामध्ये ग्रॉक ३ ने Gemini 2 Pro, Deepseek V3 आणि ChatGPT 40 ला मागे टाकले, विशेषतः विज्ञान, कोडिंग आणि गणित या क्षेत्रांमध्ये.
GROK 3: SOLVING PHYSICS, GAMES, AND THE UNIVERSE
— Mario Nawfal (@MarioNawfal) February 18, 2025
Full presentation and demo of xAI's latest model
0:00 xAI's mission: Understand the universe
1:20 Team presentation
2:01 Grok means to profoundly understand
2:29 From Grok 2 to Grok 3
6:30 Grok 3 benchmarks
9:07 Grok 3 improves… https://t.co/7qbB6O16Yb pic.twitter.com/BomGwAOa1I
कंपनीने आपल्या चॅटबॉटला ‘ग्रॉक’ असे नाव का दिले हे देखील मस्क यांनी स्पष्ट केले. हा शब्द रॉबर्ट हेनलेन यांच्या ‘स्ट्रेंजर इन अ स्ट्रेंज लँड’ या पुस्तकातून घेतला आहे, ज्यामध्ये तो मंगळावर वाढलेल्या एका पात्राने वापरला आहे. मस्क म्हणाले की याचा अर्थ पूर्णपणे आणि खोल आकलनाने काहीतरी जाणून घेणे. त्यांनी असेही म्हटले की ‘ग्रॉक’ हा शब्द सखोल समज दर्शवतो. डेमो दरम्यान, xAI अधिकाऱ्यांनी असेही उघड केले की त्यांनी ग्रॉक तयार करण्यासाठी स्वतःचे डेटा सेंटर बांधले आहे.
ओपनएआयचे मालक आणि एलोन मस्क यांच्यात जोरदार वाद सुरू असतानाच ग्रॉक ३ लाँच करण्यात आले आहे. मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ओपनएआय खरेदी करण्याची ऑफर दिली होती. कंपनीने ती नाकारली आणि त्याऐवजी मस्कला X विकण्याची ऑफर दिली. दुसरीकडे, गेल्या महिन्यात चीनच्या डीपसीक एआयने जगभरात खळबळ उडवून दिली. लाँच झाल्यानंतर, टेक जायंट एनव्हीडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!