Electric Scooter : जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अनेक मोठ्या कंपन्या आता फक्त इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करत आहेत. भारतात इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत नवीन कंपन्यांसह अनेक मोठ्या आणि लोकप्रिय कंपन्यांनी त्यांच्या नवीन स्कूटर लॉन्च केल्या आहेत. यात ओला, एथर आणि अँपिअर इलेक्ट्रिकसह अनेक कंपन्या आहेत. सध्या विक्रीच्या बाबतीत ओला इलेक्ट्रिक अव्वल स्थानावर आहे.
जर तुम्ही पेट्रोलच्या किमतीपासून मुक्त होण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण सध्या इलेक्ट्रिक वाहने हे एक नवीन तंत्रज्ञान आहे. बहुतांश लोकांना या वाहनांची योग्य माहिती नसते. अशा स्थितीत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ज्यामुळे नंतर कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. येथे तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहोत.
बॅटरी आणि वॉरंटी
कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनाचा सर्वात महाग भाग म्हणजे त्याची बॅटरी. त्यामुळे स्कूटर खरेदी करण्यापूर्वी त्याच्या बॅटरी क्षमतेसह गुणवत्ता आणि ब्रँडचीही माहिती घ्यावी. याशिवाय प्रत्येक कंपनी बॅटरीवर वॉरंटीही देते, त्यामुळे बॅटरीची वॉरंटी किती वर्षांची किंवा किलोमीटरची आहे हे जाणून घेतले पाहिजे.
हेही वाचा – IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरने ठोकला ‘कडक’ षटकार; बॉलरने दिली ‘अशी’ रिअॅक्शन; पाहा Video
सुरक्षितता
गेल्या वर्षी देशात इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. चार्जिंगच्या वेळी अनेक स्कूटरलाही आग लागली. यानंतर, सरकार आणि कंपन्यांच्या कडकपणात सुधारणा करताना स्कूटरमध्ये आग किंवा स्फोट होऊ नये म्हणून अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत तुम्ही खरेदी करत असलेल्या स्कूटरमध्ये पुरेशी सुरक्षा आहे की नाही, हे तपासले पाहिजे.
रेंज
इलेक्ट्रिक वाहनाचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याची रेंज. कारण कोणतेही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यापूर्वी फक्त त्याची रेंज विचारली जाते. अशा स्थितीत, तुम्ही ज्या स्कूटरची खरेदी करणार आहात त्या स्कूटरची दावा केलेली रेंज आणि वास्तविक रेंज शोधणे आवश्यक आहे. वास्तविक रेंज साठी, जुन्या ग्राहकाकडून अभिप्राय घेतला जाऊ शकतो किंवा फीडबॅक ऑनलाइन देखील पाहता येईल.
चार्जिंग
रेंजसोबतच, कोणतीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना सर्वात मोठा प्रश्न विचारला पाहिजे तो म्हणजे बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी लागणारा वेळ. ही स्कूटर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते की नाही? कारण स्कूटरमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट नसेल तर अनेक वेळा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय तुम्ही बॅटरी स्वॅपिंगचा पर्यायही निवडू शकता. अनेक स्कूटरमध्ये काढता येण्याजोग्या बॅटरीची सुविधा मिळत आहे.
स्पीड आणि बिल्ड क्वॉलिटी
आजकाल बाजारात येणाऱ्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटरचा स्पीड खूपच कमी आहे, जरी ब्रँडेड स्कूटरमध्ये चांगला स्पीड दिसून येतो. त्यासोबतच एक्सीलेरेशनही चांगले आहे. अशा स्थितीत स्पीडबाबतही प्रश्न विचारणे आवश्यक आहे. शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्कूटरची बिल्ड क्वॉलिटी तपासणे. कारण काही स्थानिक कंपन्या निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरतात.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!