AAP : आम आदमी पक्षाला मिळाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा..! निवडणूक आयोगाचा निर्णय

WhatsApp Group

AAP Now National Party : निवडणूक आयोगाने तीन राष्ट्रीय पक्ष आणि दोन प्रादेशिक पक्षांचा दर्जा काढून घेतला आहे. त्याचबरोबर एका पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. याशिवाय आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला हा दर्जा मिळाल्यावर पक्षाच्या नेत्यांनी ट्वीट करून शुभेच्छा दिल्या आहेत. केजरीवाल यांनी ट्वीट केले की, हे चमत्कारापेक्षा कमी नाही. याशिवाय, प्रादेशिक पक्षांमध्ये, निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेशमधील भारत राष्ट्र समिती (BRS) आणि यूपीमधील राष्ट्रीय लोक दल (RLD) यांच्याकडून प्रादेशिक पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे.

तीन पक्षांकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का हिरावला गेला?

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार या पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला होता, मात्र हे पक्ष तेवढे निकाल लावू शकले नाहीत, त्यामुळे हा दर्जा काढून घेण्यात आला आहे. त्यांना 2 लोकसभा निवडणुका आणि 21 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी पुरेशी संधी देण्यात आली होती. त्यानंतर या पक्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला. मात्र, पुढील निवडणुकीच्या चक्रात या पक्षांना त्यांच्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो.

हेही वाचा – शिंदे सरकारकडून गूड न्यूज! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार 177 कोटी; कारण…

या पक्षांना काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), मेघालयमध्ये तृणमूल काँग्रेस आणि व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी, त्रिपुरामधील टिपरा मोथा यांना मान्यताप्राप्त राज्य राजकीय पक्षांचा दर्जा देण्यात आला आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा मिळवायचा?

  • निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी काही प्रमुख अटी पूर्ण कराव्या लागतात. जर कोणत्याही पक्षाने त्या अटी पूर्ण केल्या तर निवडणूक आयोग (EC) त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देतो.
  • 4 राज्यांमध्ये एखाद्या पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्यास त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
  • जर एखाद्या पक्षाने 3 राज्ये एकत्र करून लोकसभेत 3 टक्के जागा जिंकल्या तर त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
  • लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीत 4 लोकसभा जागांच्या व्यतिरिक्त 4 राज्यांमध्ये एखाद्या पक्षाला 6 टक्के मते मिळाली, तर तो राष्ट्रीय पक्ष मानला जातो.
  • कोणत्याही पक्षाने या तीनपैकी कोणतीही एक अट पूर्ण केल्यास त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त होतो.

देशात आता किती राष्ट्रीय पक्ष आहेत?

  • भारतीय जनता पक्ष (भाजप)
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
  • बहुजन समाज पक्ष (BSP)
  • भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (CPM)
  • नॅशनल पीपल्स पार्टी (NPP)
  • आम आदमी पार्टी (आप)

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment