निवडणूक आयोगानं ‘कालीन भैय्या’ला दिली ‘नवी’ जबाबदारी; अभिनेता म्हणाला…

WhatsApp Group

Pankaj Tripathi : ओटीटीपासून ते चित्रपटांच्या दुनियेत आपला ठसा उमटवणाऱ्या ‘कालीन भैय्या’ फेम पंकज त्रिपाठीने निवडणूक आयोगाचीही (Election Commission of India) मने जिंकली आहेत. निवडणूक आयोगाने पंकज त्रिपाठीला राष्ट्रीय आयकॉन बनवण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी केली. पंकज त्रिपाठीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रत्येक घराघरात एक खास ओळख निर्माण केली आहे. मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरुकता वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने पंकज त्रिपाठीचा चेहरा निवडला आहे.

मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोग नेहमीच देशातील सेलिब्रिटींना राष्ट्रीय आयकॉन किंवा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून आणतो. शेवटच्या वेळी चेतेश्वर पुजाराला २०१४च्या निवडणुकीत गुजरातमधील निवडणूक प्रचारासाठी ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले होते. याशिवाय महेंद्रसिंह धोनीलाही निवडणूक आयोगाने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून रिंगणात उतरवले होते.

हेही वाचा – Jio Book : अंबानींनी ‘गूपचूप’ लॉन्च केला त्यांचा पहिला लॅपटॉप; किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी!

मतदानाबाबत जनजागृती करण्याचा उद्देश

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे सोमवारी ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) च्या सहकार्याने एक मालिका सुरू करणार आहेत. मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही विशेष रेडिओ मालिका सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

पंकज त्रिपाठी म्हणाला…

पंकज त्रिपाठी स्वतःला मिळालेल्या या नव्या जबाबदारीने खूश आहे. त्याने ट्वीट करून कृतज्ञताही व्यक्त केली आहे. ”धन्यवाद, निवडणूक आयोगाने सोपवलेली ही जबाबदारी मी निष्ठेने पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन”, असे पंकजने सांगितले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment