Earthquake : लडाखच्या कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के..! केंद्रबिंदू चीनमध्ये

WhatsApp Group

Earthquake In Ladakh Kargil : जम्मू-काश्मीरमधील कारगिलपासून काही अंतरावर मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.३ नोंदवण्यात आली. सकाळी १०.०५ वाजता भूकंप झाला. त्याचवेळी लेहमध्ये त्याची तीव्रता ४.३ नोंदवण्यात आली. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू चीनच्या जंगगुई प्रांतात जमिनीच्या १० किमी आत होता.

यापूर्वी १६ सप्टेंबरला लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. १६ सप्टेंबर रोजी पहाटे ४.१९ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, १६ सप्टेंबरला झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू अल्ची (लेह) पासून १८९ किमी उत्तरेस होता आणि त्याची खोलीही जमिनीच्या खाली १० किमी होती.

हेही वाचा – वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये भूकंप..! वर्ल्डकपमध्ये घाण खेळल्यानंतर कॅप्टननं घेतला ‘मोठा’ निर्णय

इंडोनेशियात भूकंप

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सोमवारी भूकंपाच्या धक्क्याने मोठ्या इमारती कोसळल्या. आतापर्यंत १६२ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता ५.६ इतकी होती. मृतांचा आकडा वाढू शकतो. ढिगाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात लोक दबले गेले आहेत. भूकंपानंतर ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव कर्मचारी मंगळवारी घटनास्थळी पोहोचत आहेत.

Leave a comment