“यंदा दसरा मेळाव्याला बोलावलं तर मी पण…”; नारायण राणेंच्या ‘थेट’ वक्तव्यामुळं वाद वाढणार?

WhatsApp Group

Shivsena Dasara Melava 2022 : मुंबईतील शिवाजी पार्कवर गेल्या ४० वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला जातो. स्वातंत्र्यदिनाला लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांच्या भाषणाची देशातील जनता ज्या प्रकारे वाट पाहत असते, त्याचप्रमाणे या मेळाव्यातील पक्षप्रमुखांच्या भाषणाची शिवसैनिक वाट पाहत असतात. कोरोनाची दोन वर्षे वगळता शिवसेनेचा मेळावा दरवर्षी दसऱ्याला होत आहे. मात्र यावेळी एक पेच निर्माण झाला आहे. यावेळी कोणाचा दसरा मेळावा होणार? उद्धव ठाकरे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

शिवाजी पार्क मैदानाच्या बुकिंगसाठी दोन्ही गटांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज पाठवले आहेत. मात्र याबाबतचा निर्णय गणेशोत्सवानंतरच घेतला जाईल, असं दादर येथील बीएमसीच्या जी-उत्तर विभागाच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे. पण खरी शिवसेना कोणाची हे ठरवणार कोण? न्यायालयातील सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नाही, तसंच निवडणूक आयोगानं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मग शिवाजी पार्कवर शिवसेनेचा मेळावा बोलवण्याचा अधिकार कोणत्या गटाला आहे हे कोण ठरवणार?

हेही वाचा – मनसे नेत्यानं महिलेला लगावली कानशिलात! व्हायरल VIDEO नंतर राज ठाकरेंनी मागितली माफी आणि…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

दरम्यान, आता शिवाजी पार्कवर होणाऱ्या मेळाव्याला शिंदे गट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करणार असल्याचंही वृत्त आहे. त्यावर ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाला हात जोडून विनवणी केली आहे की, मित्रांनो, असं करू नका, उद्धव ठाकरेंशिवाय दसरा मेळावा करून शिवसेनेचं नाव बदनाम करू नका. या प्रकरणात शिंदे गटानं आपल्या आमदारांना दसऱ्यासाठी मुंबईतच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी हा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ”सध्या गणेशोत्सव सुरू आहे. यानंतर नवरात्र सुरू होईल. त्यानंतर दसरा येईल. आतापासून काय सांगू आमच्या मनात काय आहे ते?” नारायण राणेंची भेट घेतल्यानंतर शिंदेनी ही प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Asia Cup 2022 : टीम इंडियाला जबर धक्का..! रवींद्र जडेजा स्पर्धेबाहेर; ‘या’ अष्टपैलू खेळाडूला संधी!

नारायण राणे म्हणाले…

मनसेपाठोपाठ आता या वादात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ”एकनाथ शिंदे यांनी एक निर्णय घेतला, तो म्हणजे उद्धव ठाकरे सरकारला घरी बसवले. शिंदे हे स्वत: च्या हिमतीवर राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे. जर दसरा मेळावा झाला तर तो एकनाथ शिंदे घेतील. आणि त्यांनी दसरा मेळाव्याला बोलावलं तर मी पण नक्की येईन”, असं नारायण राणे म्हणाले. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त भेट दिली होती.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment