Air India Flight : पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात धक्कादायक घटना घडली आहे. विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने महिलेच्या ब्लँकेटवर लघवी केली. दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. मात्र, दारू पिणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्याने लेखी माफी मागितली आहे. ही घटना ६ डिसेंबरची असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइटच्या पायलटने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) घटनेची माहिती दिली. त्यानंतर आरोपी प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. मात्र, प्रवाशी फ्लाइटच्या कोणत्या क्लासमध्ये प्रवास करत होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एअर इंडियाचे पॅरिस-दिल्ली फ्लाइट-१४२ सकाळी ९.४० वाजता दिल्लीत दाखल झाले. दरम्यान, आरोपी प्रवाशाने मद्यपान केले होते आणि केबिन क्रूच्या सूचनांचे पालन करत नसल्याचे विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्याने महिलेच्या ब्लँकेटमध्ये लघवी केली.
हेही वाचा – Petrol Pump वर ‘असं’ गंडवलं जातं..! तुम्हाला आलाय का अनुभव? जाणून घ्या!
Another incident of mid-air peeing: Man 'urinated on' female passenger's blanket during Paris-Delhi Air India flight
Read @ANI Story | https://t.co/oimIRPIT9z#AirIndia #Paris #NewDelhi pic.twitter.com/dyzEo0uNRG
— ANI Digital (@ani_digital) January 5, 2023
सीआयएसएफकडून प्रवासी ताब्यात पण…
या आरोपी प्रवाशाला सीआयएसएफने विमानातून उतरताच ताब्यात घेतले. असे म्हटले जाते की त्याच्यात आणि पीडितेमध्ये तडजोड झाली आहे आणि आरोपीने लेखी माफीही मागितली आहे. त्यापूर्वी पीडित महिलेने आरोपी प्रवाशाविरुद्ध लेखी तक्रार दिली होती. मात्र, तडजोड झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार करण्यास नकार दिला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या सर्व प्रकारानंतर आरोपीची कागदपत्रे तपासण्यात आली आणि त्यानंतर त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली.
याआधीही प्रकार…
विशेष म्हणजे २६ नोव्हेंबरलाही एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये असेच लज्जास्पद कृत्य घडले होते. त्यावेळीही एका पुरुषाने महिला सहप्रवाशावर लघवी केली होती. दिल्ली पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून एफआयआरही नोंदवला होता. आरोपींना पकडण्यासाठी त्यांनी अनेक पथकेही तयार केली होती. कारवाई न करण्याच्या प्रश्नावर एअर इंडियाने डीजीसीएला सांगितले की, महिला प्रवासी आणि आरोपी यांच्यात तडजोड झाल्यानंतर वाद मिटला. त्यामुळे याप्रकरणी कोणतीही तक्रार करण्यात आली नाही.