DRDO मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती..! जाणून घ्या अर्जाची प्रोसेस आणि सॅलरी

WhatsApp Group

DRDO Recruitment 2024 | डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने डिफेन्स सायंटिफिक इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंटेशन सेंटर (DESIDOC) मध्ये 30 शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अधिसूचना जारी करून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवार mhrdnats.gov.in किंवा nats.education.gov.in या पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात.

अप्रेंटिस पदासाठी लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये 25 आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये 5 जागा रिक्त आहेत. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, नोंदणी नसलेल्या उमेदवारांचे अर्ज फेटाळले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – श्रेयस अय्यर खोटं बोलला? राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने केली पोलखोल!

याप्रमाणे अर्ज करा

  • या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला होमपेजवरील DRDO रिक्रूटमेंट 2024 लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • तुमच्या समोर दिसणाऱ्या विंडोमध्ये तुम्हाला तुमचा तपशील भरावा लागेल.
  • सर्व तपशील भरल्यानंतर, ते एकदा तपासा आणि नंतर कागदपत्रे अपलोड करा.
  • फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या.

पात्रता आणि पगार

लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्सच्या उमेदवारासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे, यासोबतच मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. 12वी आणि लायब्ररी सायन्समध्ये डिप्लोमा असलेले उमेदवारही या अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू शकतात. कॉम्प्युटर सायन्समध्ये अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना 8 हजार ते 9 हजार रुपये मानधन मिळेल. पदवीधर उमेदवारांना दरमहा 9 हजार रुपये, 12वी उत्तीर्ण आणि संगणक विज्ञान पदविका असलेल्या उमेदवारांना दरमहा 8000 रुपये स्टायपेंड दिले जाईल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment