तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने नोकरीसंदर्भात (DRDO Recruitment 2023 In Marathi)अधिसूचना जारी केली आहे. याद्वारे अनेक पदांवर भरती केली जाणार आहे. 29 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असूव अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 अशी आहे. तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही www.apprenticeshipindia.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय, तुमच्याकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
किती पदांची भरती?
32 पदांवर भरती होणार आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. जर तुम्ही आरक्षित प्रवर्गातून आलात तर तुम्हाला वयोमर्यादेत काही सूट दिली जाईल.
पगार
तुमची या पदासाठी निवड झाल्यास तुम्हाला दरमहा 12,000 रुपये पगार दिला जाईल. तर डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 11,000 रुपये पगार मिळेल.
हेही वाचा – दररोज आंघोळ करणे शरिरासाठी हानिकारक! जाणून घ्या विज्ञान काय सांगते
निवड प्रक्रिया
या पदावरील निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. या पदासाठी सर्वप्रथम वैद्यकीय परीक्षा घेण्यात येणार आहेत. जे पास होतील त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
पॅन कार्ड
आधार कार्ड
जात प्रमाणपत्र
ई – मेल आयडी
मूळ पत्ता पुरावा
स्कॅन केलेली स्वाक्षरी
स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो
याप्रमाणे अर्ज करा
अधिकृत वेबसाइट www.apprenticeshipindia.gov.in वर जा.
होम पेजवर अॅप्रेंटिसशिप संधी वर क्लिक करा.
येथे तुम्हाला नवीन खाते तयार करावे लागेल.
यानंतर फॉर्ममधील सर्व आवश्यक अपडेट्स भरा.
यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.
शेवटी, त्याची प्रिंट काढून ठेवा.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!